आज ७ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित, ठामपाची कारवाई सूरूच

  ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज ७ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली असून एकाविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.   या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील दिवा पश्चिम नागवाडी येथिल दत्ता काशिनाथ पाटील यांचे पहिल्या मजल्यावरील आरसीसी कॉलम व स्लॅब तोडण्यात आले. तसेच माजिवडा मानपाडा प्रभाग समिती २, नौपाडा प्रभाग समिती २, वर्तकनगर प्रभाग समितीमधील येऊर येथे १ आणि कळवा प्रभाग समितीमधील १ वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.      सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर, डॉ.अनुराधा बाबर, शंकर पाटोळे, प्रणाली घोंगे आणि सचिन बोरसे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली.      दरम्यान दिवा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३९७ (क) (१) ख, अन्वये राजेश नथुराम मोहिते यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.  सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या