Top Post Ad

९ आगस्ट क्रांती दिना पासून "आजादी आंदोलन अभियान"

  ठाणे -  सामाजिक न्याय व दलित आदिवासींच्या बाजुने उभे राहणारे अनेक कार्यकर्त्ये राजद्रोहच्या खोट्या आरोपात जेलमध्ये अडकून पडले आहेत.  केंद्र सरकार काही धर्मांध, दहशतवादी वर्तन करणारे काही विशिष्ट गटांना पाठीशी घालून सामाजिक परिवर्तन घडवू पाहणारे कार्यकर्त्यांना युएपीए कायद्याचा दुरोपयोग करत गजाआड करत आहे.  सरकार विरोधातील आवाज दाबून अप्रत्यक्षपणे हुकूमशाही गाजवत आहे.  या विरोधात देशभरातील विविध जनसंघटनांचा समन्वय अर्थात एन.ए.पी.एम मार्फत देशभर जनजागृती साठी   "आजादी आंदोलन अभियान" अंतर्गत येत्या ९ आगस्ट क्रांती दिना पासून वर्षभरात विविध कार्यक्रम व आंदोलन उभारण्याचा  निर्धार  करण्यात आल्याचे एन.ए.पी.एम चे महाराष्ट्र समन्वयक जगदीश खैरालिया यांनी सांगितले.  फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.* UAPA सारखे सैतानी कायदे रद्द करा ! या मागण्यांसाठी ठाण्यात निदर्शने करून राष्ट्रपतीना निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.

सामाजिक न्याय आणि आदिवासीं साठी आयुष्य वेचणारे फादर स्टेन स्वामी यांचे न्यायालयीन कस्टडीत असतांना निधन झाले होते. ८५ वर्षीय स्टेन स्वामी आजारी असतांना  त्यांची गंभीर अवस्था होईपर्यंत त्यांना योग्य उपचार न दिल्यानेएका प्रकारे हा शासन पुरूस्क्रुत खूनच आहे. अशा आरोप करत जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय चा पुढाकाराने ठाण्यातील विविध समविचारी संस्था संघटनांतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ २३ जुलै २०२१ रोजी निषेध निदर्शने करण्यात आली होती. निदर्शनात जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, श्रमिक जनता संघ, इंटक, म्युज फाऊंडेशन, भारतीय महिला फेडरेशन, बहुजन असंघटीत मजदूर संघटना, SIP, समता विचार प्रसारक संस्था, RMPI, आदी संघटनांचे पदाधिकारी - कार्यकर्ते सहभागी झाले होते.

   फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,  UAPA आणि राजद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले गेलेले निरपराध कार्यकर्ते यांच्या बाबतीत योग्य व तातडीच्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ताबडतोब जामीन मंजूर करण्यात यावे,  आणि UAPA सारखे सैतानी कायदे रद्द करावे, संविधान बचाओ - देश बचाओ अश्या मागण्यांचे निवेदन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ठाण्याचे निवासी जिल्हाधिकारी श्री शिवाजी पाटील  यांच्या मार्फत सादर करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात जगदीश खैरालिया, टी. ललिता, निर्मला पवार, सुब्रतो भट्टाचार्य, अजय भोसले, धोंडीराम खराटे,  सुनील दिवेकर,  उमाकांत पावसकर, लिलेश्वर बन्सोड, भास्कर गव्हाळे, ओंकार गरड आदी कार्यकर्ते होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com