अनधिकृत बांधकामांवर कारवाई सूरुच : दोघांविरूद्ध गुन्हा दाखल


  ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहिम सुरु असून आज दिवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करून दोघांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.  या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समितीमधील सद्गुरू नगर येथील रतीलाल आगरखडे यांचे अनाधिकृत बांधलेले आरआरसी कॉलम तोडण्यात आले. तसेच अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३९७ (क) (१) ख, अन्वये दत्ताराम काशीनाथ पाटील व रतीलाल आगरखडे यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या