भिवंडीत दोन गटात वाद; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

भिवंडी- पालघर व ठाणे जिल्ह्यात सामाजिक ,शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जिजाऊ संस्थेच्या गावागावात शाखा उदघाटन करून संघटनेचा कार्य विस्तार सुरू केलेला  असताना रविवारी जिजाऊ संस्थेच्या भिवंडी तालुक्यात तब्बल 20 शाखांचे उदघाटन संस्थापक निलेश सांबरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी शेवटच्या टप्प्यात भिवंडी तालुक्यातील वालशिंद गावातील टेपाचा पाडा या ठिकाणी शाखा उदघाटन होत असताना स्थानिक देवा ग्रुपचे कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्या त्या ठिकाणावर येऊन त्यांनी विरोध केला.  

कोरोनाचे संकट असताना दिडशेपेक्षा जास्त बाहेरील नागरिक आमच्या गावात आल्याने आमच्या गावातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.असे म्हणत याबाबत जाब विचारला.  गावात कोरोना वाढू शकतो असा विरोध केला असता त्यामधून दोन गटात वाद निर्माण  झाला व धक्काबुक्की आणि गाड्या फोडण्यात आल्या.त्यानंतर दोन्ही गटाने एकमेकांच्या परस्पर विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.मात्र सद्या सोशल मिडियावर जिजाऊ संस्थेचे कार्यकर्ते आणि देवा ग्रुपचा वाद सुरु झालेला असताना देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी आज  आपला विरोध पत्रकारांसमोर व्यक्त करीत थेट निलेश सांबरे यांच्या गुन्ह्याचा पाढा वाचून त्यांनाच तडीपार करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि ठाणे, पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.

 निलेश सांबरे यांच्यावर वाडा पोलीस ठाणे 54/2013,अंधेरी पोलीस ठाणे 407/2017,ठाणे पोलीस ठाणे1272/2017,तारापूर पोलीस ठाणे 12/2018,वाणगाव पोलीस ठाणे 16/2018,वाडा पोलीस ठाणे 322/2018, वाडा पोलीस ठाणे 287/2019,वाडा पोलीस ठाणे 183/2020,विक्रमगड पोलीस ठाणे 32/2021, भिवंडी तालुका पोलीस ठाणे येथे ऍट्रॉसिटी  कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.आशा पध्द्तीने अनेक गुन्हे दाखल असून एवढे गुन्हे दाखल असल्याने सामाजिक शांतता भंग होण्याचा धोका असल्याने त्यांना तडीपार करून  मोक्का लावण्याची मगणी व्यक्त केली आहे 

 शासनाने कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने आणखी किती ठिकाणी जमाव केला या प्रकरणीही गुन्हे दाखल करण्याची मगणी केली आहे..यावेळी देवा ग्रुपचे अध्यक्ष सुजित ढोले उर्फ पप्या, सचिव तानाजी मोरे, कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरेंद्र गुळवी, कार्यकर्ते यांच्यासह गावातील नागरिक सुद्धा उपस्थित होते.मात्र जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या