
कोरोनाची घटती प्रकरणे लक्षात घेता अनेक राज्यांत शाळा पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर काही राज्यांनी देखील शाळा सुरू करण्याची घोषणा केली आहे. काही राज्यांत शाळा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या सुमारे 5,900 शाळांमध्ये 15 जुलैपासून ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या सर्व शाळा अशा क्षेत्रात आहेत जिथे कोरोनाची नवीन प्रकरणे येत नाहीत. या शाळांमध्ये सुमारे चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या शाळांमध्ये कोविड प्रोटोकॉल पाळला जात आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या बड्या शहरात मात्र अद्यापही बहुतांश शाळा बंदच आहेत.
महामारी रोग तज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया यांच्या ममते मुलांसाठी तिसरी लाट अधिक धोकादायक असेल याचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही. जर आपण पहिली आणि दुसरी लाट पाहिली तर मुलांवर कमी परिणाम दिसून आला. एकूण गंभीर रूग्णांपैकी केवळ 10 ते 11टक्क लोक 18 वर्षांखालील होते. मुलांना असणारा धोका कमी असण्यामागे वैज्ञानिक आधारही आहे. हा विषाणू फुफ्फुसात एसीई -2 नावाच्या रिसेप्टर्सला जोडतो. मुलांमध्ये हे रिसेप्टर्स कमी विकसित असतात. या कारणास्तव, मुलांमध्ये संक्रमणानंतरही गंभीर लक्षणे उद्भवत नाहीत. तिसरी किंवा चौथी लाट असलेल्या देशांमध्येही मुलांवर फारसा परिणाम झालेला नाही. नवीन व्हेरिएंट देखील मुलांवर फारसा परिणाम करीत नाहीत. म्हणजेच त्या तुलनेत मुलांना कोणताही धोका नाही. जगातील बर्याच देशांमध्ये कोरोना पीकवर असताना शाळा फक्त काही काळासाठीच बंद ठेवण्यात आली होती. इतर वेळी शाळा सुरु होत्या.मात्र याकाळात मुलांनी सामाजिक अंतर आणि कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करणे आवश्यक होते. या काळात बर्याच देशांनी त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये मोठे बदल केले आहेत.
‡व्हेंटिलेशन आणि सामाजिक अंतर यासारख्या सुरक्षा उपायांचे अनुसरण करण्यासाठी शाळांमध्ये स्ट्रक्चरल बदल करावे लागतील. वर्ग खुल्या व हवेशीर ठिकाणी घ्यावे लागतील. ‡ पूर्ण नियोजन करून शाळा टप्प्याटप्प्याने उघडल्या पाहिजेत. सुरुवातीला, रोजऐवजी एक किंवा दोन दिवसाआड वर्ग घेतले पाहिजे. ‡ मुलांना वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागून ऑल्टरनेट दिवशी बोलावले पाहिजे. आठवड्याचे तीन दिवस एक बॅच आणि इतर तीन दिवशी दुसरी बॅच घ्यायला हवी. ‡ इयत्ता 9 वी ते 12 वीच्या शाळा उघडण्याऐवजी प्रथम लहान वर्ग सुरु केले पाहिजेत, कारण लहान मुलांना कोरोना इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी आहे. ‡ तसेच मुलांना शाळेत पाठवायचे की नाही याबाबतचा निर्णय पालकांच्या हाती असावा
0 टिप्पण्या