Trending

6/recent/ticker-posts

राज्यात सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू

    राज्यात सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होत असून त्यासंदर्भातले परिपत्रक राज्य शासनातर्फे जारी करण्यात आलं आहे. राज्यातील निर्बंध उठवताना ५ टप्पे करण्यात आले असून त्यानुसार निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत.  .  राज्यात कोविड रुग्णांची परिस्थिती वेगवेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर आणि ‘रुग्ण असलेले’ ऑक्सिजन बेड यांची संख्या वेगवेगळी असून येत्या सोमवारपासून निर्बंध उठविण्याची प्रक्रिया सुरू करताना याच निकषांवर विविध पाच स्तरांमध्ये निर्बंध उठवण्यासंबंधी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांना विविध प्रशासकीय घटकांमध्ये विभाजित करण्यात आले असून अटी आणि शर्तींनुसार अनलॉक प्रक्रिया राबविली जाणार आहे. निर्बंध उठवताना जिल्ह्यातील कोविड प्रसाराचे दर, तेथे उपलब्ध असलेले वैद्यकीय उपचार सुविधा, वैद्यकीय संसाधनाची उपलब्धता या आधारे मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे अर्थचक्राला पुन्हा गती मिळणार असून त्यासोबतच प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठीही नाइलाजस्तव अनेक ठिकाणी निर्बंध लागू असतील. 

ठाण्यात सोमवारपासून सर्व व्यवहार सुरळीत होणार असल्याचं राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार स्पष्ट झालं आहे.  ठाण्याचा अंतर्भाव हा पहिल्या टप्प्यात येणार असल्यानं ठाण्यात आता कोणतेही निर्बंध असणार नाहीत. मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, रेस्टॉरंट, दुकानं, सार्वजनिक जागा, मैदानं, खाजगी तसंच सरकारी कार्यालयं, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न समारंभ, अंत्ययात्रा, बांधकाम, सार्वजनिक वाहतूक, जीम, सलून, ब्युटी पार्लर्स हे सर्व नेहमीप्रमाणे पूर्ण क्षमतेनं सुरू राहणार आहेत. तर आंतर जिल्हा प्रवासासाठी इतर जिल्ह्यातून येणा-या नागरिकांना मात्र ई पास बंधनकारक करण्यात आला आहे

मुंबई महापालिका, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, वसई –विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली महापालिका यांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून गणले जाणार आहे. ३४ जिल्ह्यांमधील उर्वरित क्षेत्राला एक वेगळं प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचा समावेश नसेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन एखाद्या दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पाठवू शकतात. याचा अंतिम निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावे लागेल. राज्य भरासाठी विविध वर्गात सामील होणाऱ्या क्षेत्रांकरिता पाच स्तर तर बनविण्यात आले आहेत.

 या स्तरांची अंमलबजावणी त्या ठिकाणच्या पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडच्या टक्केवारीवर अवलंबून असेल. प्रत्येक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे आपल्या कार्यक्षेत्रातील स्तरांच्या आधारे निर्बंध उठवतील. याकरिता मार्गदर्शक तत्त्व जाहीर करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यापेक्षा कमी भरलेले असतील ते क्षेत्र स्तर १ मध्ये जातील. ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी 25 ते 40 च्या दरम्यान असेल ते क्षेत्र स्तर २ मध्ये असतील. पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के दरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सिजन बेड 40 टक्क्यांपेक्षा जास्त असेल ती ठिकाणे स्तर ३ मध्ये असतील. ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्के दरम्यान असेल आणि 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असेल ती ठिकाणं स्तर ४ मध्ये असतील. 

तर  स्तर ५ मध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी जर असेल आणि 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल. पहिल्या स्तरासाठी नियमित सुपर स्प्रेडर, जे लोकल ट्रेनने प्रवास करतात, किंवा लग्नसमारंभातील गर्दी.

स्तर २ साठी गर्दीच्या ठिकाणी कमीत कमी हजेरी, सार्वजनिक ठिकाणी गटांमध्ये जमा होण्यास प्रतिबंध, तर तिसऱ्या स्तरासाठी पाच वाजल्यानंतर दररोज तसेच आठवड्याच्या शेवटी कमीत कमी वावर / आवागमन.

स्तर ४ साठी पाच वाजल्यानंतर तसेच आठवड्याच्या शेवटी आणि आठवडाभर कोणतेही आवागमन किंवा हालचाली वर पूर्णता बंदी. फक्त आवश्यक आणि आपत्कालीन कारणांसाठी मुभा

पाचव्या स्तरात फक्त आपत्काल आणि आवश्यक कारणांसाठी ये-जा करण्याची परवानगी


Post a Comment

0 Comments