युवक, युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगारच्या संधी

  युवक , युवतींना हेल्थकेअर, पॅरामेडिकल व नर्सिंग, व डोमेस्टिक वर्कर क्षेत्रांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगारच्या संधी उपलब्ध

ठाणे :आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे तसेच या क्षेत्रातील संसाधनांमधील आवश्यक प्रशिक्षित मुनष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा, याकरीता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्हयातील १८ ते ४५ वयोगटातील युवक / युवतींना हेल्थकेअर, पॅरामेडिकल व नर्सिंग, व डोमेस्टिक वर्कर क्षेत्रांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगारच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास विभाग सदर योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्यात एकूण २०.००० उमेदवारांना हेल्थकेअर, पॅरामेडीकल आणि नर्सिंग, व डोमेस्टिक वर्कर या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देणार  आहे.

या योजनेअंतर्गत ठाणे जिल्हयातील शासकीय इस्पितळे तसेच वैद्यकीय शिक्षण संस्था आणि २० पेक्षा अधिक बेड्स असलेले खाजगी इस्पितळे यांचेमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळे सदर इस्पितळे व वैद्यकीय संस्थांनी माहिती खालील गुगल फॉर्म मध्ये भरावी.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeEqG82105qx7XUd8bNd78aZPtaXNaMmd-RrOypBUYBeZnE-g/viewform?usp=sf_link

तसेच प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमअंतर्गत हेल्थकेअर, पॅरामेडिकल व नर्सिंग व डोमेस्टिक वर्कर या आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या ठाणे जिल्हयातील १८ ते ४५ वयोगटातील युवक,युवतींनी गुगल फॉर्म मध्ये https://bit.ly/2TIFCP8 या लिंक वर माहिती तात्काळ भरावी.

हे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची कार्यपदध्दत, अभ्याक्रम, नोंदणी प्रक्रिया व इतर बाबीसंबंधीत अधिक माहितीसाठी  कविता ह. जावळे, सहायक आयुक्त, (मो.नं. ९७६९८१२००९) व मिलिंद भोसले, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक ( मो.नं. ९०२२२२६६२२), जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन , ठाणे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कविता ह. जावळे, यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA