एस.व्ही.आर श्रीनिवास मागील कित्ता गिरवणार की एमएमआरडीएत नाविन्य आणणार

  

   एमएमआरडीए आयुक्‍त ए.राजीत हे निवृत्त झाल्याने  त्यांच्या ठिकाणीं गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर श्रीनिवास यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.  गृहनिर्माण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव एस.व्ही.ए. श्रीनिवास यांनी गृहनिर्माण विभागात असताना मंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीतील माहिती किंवा गृहनिर्माण दिभागाच्या धोरणात्मक बाबी कधीही  कनिष्ठ अधिकाऱ्यांशी शेअर करत नव्हते. तसेच अनेक फाईलींतर परस्पर निर्णय घेवून फाईली पाठवित असत. त्यामुळे गृहनिर्माण विभागातील अनेक अधिकाऱ्यांना विभागात बसून काप काम करापचे याचा अंदाजच येत नव्हता. आता याच पध्दतीचे काम श्रीनिवास हे एमएमआरडीएतत करणार की त्यात पुन्हा नाविन्य आणणार याबाबतचे उत्तर आगामी काळात मिळणार आहे. विशेष म्हणजे एमएमआरडीएमध्ये धरीनिवास हे यापूर्वी अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केलेले आहे. त्यात आता ते आयुक्त म्हणून जात असल्याने त्यांच्या काम करण्याच्या परथ्दतीमुळे एमएमआरडीए पुन्हा आपल्या प्रकल्पात पुढाकार घेणार कि मागे राहणार याची चर्चा सध्या एमएमआरडीएच्या वर्तुळात रंगली आहे.

कोरोना काळात बदल्या न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु आयुक्‍त ए.राजीत हे निवृत्तीमुळे या बदल्यांचा निर्णय घेण्यात आला.  गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव पंदी वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहें.  त्याचबरोबर आयएएस अधिकारी लोकेश चंद्रा, प्रधान सचित र.व का. यांची नियुक्‍ती महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई पदावर करण्यात आली आहे. तर विकास चंद्र रस्तोगी यांची नियुक्ती प्रधान सचिव (र.व का.) सामान्य प्रशासन विभाग पदावर करण्यात आली असून सिकॉमचे व्यवस्थापकिय संचालक बी वैणुगोपाल रेड्डी यांची नियुक्‍ती प्रधान सचिव वने या पदावर करण्यात आली आहे. सुमंत भांगे, व्यवस्थापकीय संचालक महारा राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ यांची नियुक्‍ती सचिव,सा.वि.स. आणि वि.चौ.अ.(2)  या पदावर करण्यात आली असून पासंबधीचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून जारी देण्यात आले. तर संध्याकाळी उशीरा आयएएस अधिकारी श्रीकर परदेशी यांची सिकॉमच्या व्यवस्थापकिय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. तर गोंदियाचे जिल्हाधिकारी दिपककुमार मीना यांची बहुजन कल्याण आणि ओबीसी विभागाच्या उपसचिव पदी नियुरक्ती  करण्यात आली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA