पॉजिटिव्हीटी अनलिमीटेड

भारताला आधूनिक युगाकडे नेण्याचा ध्यास ठेवणारे प्रधानमंत्री म्हणून राजीव गांधी यांच्याकडे पाहिलं जातं. नुकतेच त्यांचा स्मृतिदिनी सर्वत्र त्यांना स्मरण करण्यात आले.  संगणक युगाची सुरुवात केल्यानंतर आपल्या देशातील काही महाभागांनी संसदेवर गाई-म्हशीसह मोर्चा काढला होता. यावरून आपल्या देशाची मानसिकता काय आहे याचा प्रत्यय येतो. पण अशा व्यक्तीचा आत्मघातकी पथामार्फत घातपात केल्या जातो. याचे नेमके कारण काय असू शकते. याही आधी प्रधानमंत्री इंदीरा गांधी यांची हत्या करण्यात आली. या प्रधानमंत्र्यांनी असा काय गुन्हा केला होता की ज्यांना आपल्या प्राणाची किंमत मोजावी लागली. मग आजची भारताची स्थिती काय आहे. याला कोण जबाबदार आहे. तरीही या देशातील जनता शांत कशी काय राहू शकते.  आज संपुर्ण देश धगधगत्या ज्वालामुखीवर बसवला गेला आहे. मग यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली फासावर का लटकवले जाऊ नये ? सत्तेसाठी मृत्युचं राजकारण करणारी ही जमात का नष्ट करु नये ? देशवासीयांच्या शवावर इमले बांधणारी  ही जमात देशातील प्रत्येक नागरीकांनी पायाखाली तुडवून का मातीत गाडुन टाकु नये ?  आजच्या घडीला मरण इतके स्वस्त आणि सहज झाले आहे याबद्दलच्या विचाराने कधी मनाला स्पर्ष देखील केला नव्हता. कितीही नैराश्य आले तरी सहजासहजी मरण कोणाला हवे असते ? परंतु आजच्या घडीला नमस्कार करावा तसा  श्रद्धांजली, Rip वगैरे शब्द वापरले जात आहेत. सुरुवातीला एखाद्याच्या अकाली जाण्याने धक्का बसत असे.. परंतु आता वयाचे काही राहिलेच नाही.. अमुक गेला तमुक गेला रोजचेच झाले आहे... कशाचे काहीच सोयरसुतक राहिले नाही. स्वत:ला वाचवणे हिच आजची प्राथमिकता ठरत आहे. काय दिवस आले आहेत ?  याला जबाबदार कोण ?  

  याबाबत चर्चा केली तर म्हणतात निगेटीवीटी पसरवु नका. म्हणजे नेमके काय ते समजत नाही? सत्य लपवुन ठेवणे कि सत्यापासून दूर रहाणे? का उगाचच सब चंगा सी चा बागुलबुवा करणे, कि ऑल इज वेल ची टिमकी वाजवत स्वत:चे समाधान करुन घेणे... जर असे असेल तर सत्य परिस्थिती सध्या जगासमोर आणणारे मुर्ख म्हणायचे का?  भारताची प्रतिमा जगात पृथ्वीवरचा नरक अशी झाली असताना आपण पॉजिटीवीटीचा डंका वाजवत फिरायचे? अगदी पॉजिटिव्हीटी अनलिमीटेडच्या गप्पा मारायच्या. त्याच्यावर व्याख्यानं ठेवायची. म्हणजेच या नालायक नाकर्त्या सुत्रधारकांच्या भोंगळ कारभारावर पांघरुण घालायचे,  2019 साली ट्रम्प या देशात आले होते तेव्हा त्यांना गुजरातमधील झोपडपट्टी दिसू नये म्हणून त्यांच्या मार्गावरील झोपडपट्टीलगत प्रचंड मोठी भींत युद्धपातळीवर बांधण्यात आली. म्हणजे भींतीपलिकडच्या माणसांचा विकास करायचा नाही. पण भींत दाखवून देशाचा विकास होतोय हे परदेशाला दाखवायचे कारस्थान. नेमके अशाच पद्धतीने  स्मशानातल्या चिता पत्र्याच्या भिंतीने झाकुन घेतल्या परंतु नदीतून वाहुन येणार्या शेकडो प्रेतांनी वाचा फोडली त्याला आता कसे जगापासून लपवणार हा प्रश्न आहे.   

देशात वर्षभर थैमान घालत असलेल्या कोरोनावर  उपाययोजना करण्याऐवजी देशप्रेमाच आणि धर्माच राजकारण करुन देशात अराजकतेच वातावरण तयार करून आपल्या तुंबड्या भरुन घेत आहेत. मेलेल्याच्या टाळुवरच  अक्षरश: लोणी खात आहेत. संपुर्ण देशातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी यांची असताना हे कारभारी मात्र पक्षाचेच राजकारण करण्यात तल्लीन आहेत. जिथे यांची सत्ता तिथेच मदत असे काहीसे यांचे सुत्र आता गुजरातला 1100 कोटी दिल्यानंतर लपून राहिलेले नाही.   

कोरोनावर मात करण्यासाठी ज्या बाबी टाळल्या गेल्या पाहिजेत त्याच बाबींना खतपाणी घालून देशाला मृत्युच्या खाईत लोटले. मागच्या वेळी कोरोना भारताच्या दरवाजावर ठकठक करीत असतानाच नमस्ते ट्रम्प चं आयोजन करून त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा फैलाव महामारीत झाल्यानंतर लोकांना थाळ्या वाजवायला सांगितल्या. मेणबत्त्या लावायला सांगितल्या. त्यानंतर दुस्रया लाटेतही तोच प्रकार मंदीर पायाभरणी,  कुंभमेळा, निवडणुका,याला सर्व संकटांची पुर्णपणे जाणिव असताना मान्यता देणे म्हणजे हा देशद्रोहच म्हणावा लागेल. आज देशभरातून या कुंभमेळ्यात नागरीक सहभागी झाले आणि तिथून परतणारे प्रत्येकजण सुपरस्प्रेडर होऊन कोरोनाचा बॉंब ज्या त्या राज्यात, शहरात, गावात फोडत आहेत. त्याचाच परिणाम आज मरणानंतर इतभर जागाही दुर्लभ आहे...   

कोरोना महामारीचा वापरही आपल्या फायद्यासाठीच करण्यात ही मंडळी आघाडीवर. आज जागतिक बँकेने भारताला जवळपास 250 कोटी डॉलर्सची मदत दिली आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेने सुदधा जवळपास 150 कोटी डॉलर्सची मदत दिली आहे. जपान  सरकारकडूनही जवळपास 5600 कोटी रुपयांची आणि चीनकडून देखील 9000 कोटी रुपयांचे कर्ज घेतले.  फ्रान्सने 20 कोटी युरोज तर जर्मनीने 2 कोटी युरोज मदत देऊ केली आहे. ँRघ्ण्ए च्या ऱौ अनत्दज्सहू ँaहक् कडून 100 कोटी डॉलर्स देऊ केले आहेत.  वरील उदाहरणे प्रातिनिधिक आहेत याशिवाय इतर देशांनी दिलेला ऑक्सिजन पुरवठा आणि इतर मेडिकल सामग्रीची मदत वेगळी आहे. कोरोनाच्या नावावर अशी प्रचंड रक्कम जमा होत आहे  या सर्व कर्जाची परतफेड नेमकी कशी होईल हे वेगळं सांगायला नको. याचा भार देशाच्या नागरिकांवर पडणार आहे. मोठया कॉर्पोरेटला टॅक्स वाढवला की आपोआप उत्पादनावर खर्च वाढून ग्राहकाला फटका बसणार म्हणजेच महागाई वाढणार, आणि दरडोई उत्पन्न मात्र कमी होत जाणार आणि ते होत आहे.  एवढी प्रचंड रक्कम मिळूनही आरोग्यासाठी  काहीच  उपाययोजना नाहीत आणि वर्ष झाल्यावर कोरोनाचे मृत्यूतांडव थांबता थांबत नाहीये. लसीकरणाचा तर खेळखंडोबाच करून टाकला आहे. 35000 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करूनही लसीकरणासाठी राज्यावर भार सोपवून नामानिराळे होणे म्हणजे काय ते आता जनतेनेच ठरवले पाहिजे. केवळ फाईव्ह ट्रीलियन इकॉनॉमी, महासत्ता, विश्वगुरु असले शब्द वापरून संमोहित केलं गेलं आणि 1991 च्या जागतिकीकरणाच्या पूर्वी जसे बाकीचे देश आपल्याला मदत करत होते त्याच परिस्थितीत आणून सोडलं आहे. अशा परिस्थितीत देशाला आणून सोडण्रायांना आपण डोक्यावर कसे काय घेऊ शकतो. मग राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांनी असं काय केलं होतं की ज्यांची हत्या करण्यात आली.   

सुबोध शाक्यरत्न

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA