प्रोफेसर एलिनॉर झेलिएट यांना सॅल्यूट !

  गांधींपासून ते नेहरुंपर्यंत आणि आगरकरांपासून ते लोहियांपर्यंत असे अनेक 'वाद' भारतभूमीत आहेत. मात्र ते विशिष्ट सीमेपर्यत. 'आंबेडकरवाद' हा जगभराचा चर्चेचा विषय. त्याची कारणेही तशीच आहेत. देश पारतंत्र्यात असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक अर्थनीतीवर घेतलेली प्रखर भूमिका, जगाला हेवा वाटावा अशा लोकशाहीप्रधान संविधान निर्माण प्रक्रियेत त्यांचा महत्वपूर्ण मुख्य सहभाग. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. 

मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्य झोकून छेडलेले झंझावाती आंदोलन हे जगन्मान्य आहे. डॉ. आंबेडकरांच्या या झंझावाताची दखल घेण्यास, अभ्यास करण्यास जगाच्या पाठीवरचे अनेकजण भारतात येऊन गेले. प्रोफेसर एलिनॉर झेलिएट या त्यापैकीच एक अमेरिकन रायटर. १९५२ -५३ च्या दरम्यान त्या भारतात आल्या. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची विचार चळवळ समजून घेतली. ती शब्दबध्दही केली. इतकेच काय तर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दलित उत्कर्षाची चळवळ' यावर त्यांनी पीएच. डी केली. भारतातल्या अनेक गांवखेड्यात त्या फिरल्या. दलितांविषयी त्यांना प्रचंड आस्था निर्माण झाली. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, निती यावर आधारलेला आंबेडकरवाद जगासाठी महत्वाचा असल्याचे त्यांना जाणवू लागले आणि मग त्यांनी आंबेडकरी विचार साहित्यासाठी राजगृह गाठले. नामवंत विचारवंत, साहित्यिकांच्या भेटी घेत त्यांच्याकडून हवी ती पुस्तके, संदर्भ मिळवले. 

अमेरिकेतल्या एका शहारातल्या कार्लटन महाविद्यालयात history च्या प्रोफेसर असणा-या झेलिएट यांना आंबेडकरवाद समजून घेणं महत्त्वाचे वाटणे, ही बाबच एका अर्थाने गौरवपूर्ण आहे. खरंतर, झेलिएट सारख्या लेखिकेची भारतीय माध्यमांमध्ये (मोजक्या इंग्रजी वृत्तपत्रांचा अपवाद वगळता) जेवढी चर्चा व्हायला हवी होती, तितकी झाली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंती वर्षात पाच जून ला झेलिएट यांच्या जीवनाची एक्झिट झाली. झेलिएट गेल्या पण, 'संपली नाही लढाई यार हो, आंबेडकरवादाची' असंच काहीसं सांगून त्या शांत झाल्या. जून महिन्यात जागतिक आंबेडकरी विचार प्रवाहामध्ये विशेषतः राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये या लेखिकेचे स्मरण करून अभिवादन केले जाते. अमेरिकतून भारतात येऊन उपेक्षित चळवळीचा अभ्यास करणा-या आणि त्या चळवळीवर लेखन करणा-या थोर अमेरिकन रायटर अर्थात एलिनॉर झेलिएट यांनी ५ जून रोजी शेवटचा श्वास घेतला... त्यांना व त्यांच्या कार्याला विनम्र सॅल्यूट ! अ रु ण  वि श्वं भ र

९८ २२ ४१ ५४ ७२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA