राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त स्पर्धाचे आयोजन

 
*अंनिसने आयोजित केलेल्या कोकण विभागीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धत अमर पवार प्रथम*
*बहुआयामी लोकराजा राजर्षी  शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धचे आयोजन*


ठाणे - भावी पिढीला बहुआयामी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आणि कार्य लोकांना कळावे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या मार्फत कोकण विभागीय *"बहुआयामी लोकराजा राजर्षी शाहू महाराज"* या विषयावर ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हि स्पर्धा १८ ते २० जून २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती, या वक्तृत्व स्पर्धेत ५९ जणांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षन  प्रा. सुजाता सखाराम घोडीगावकर, प्रा. शंकर देवदास बळी, प्रा. आनंदराज रवींद्र घाडगे यांनी केले

विभागीय विजेते स्पर्धेत प्रथम क्रमांक अमर पवार (रत्नागिरी) दुसरा क्रमांक विवेक मधुकर वारभुवन,(नवी मुंबई) तिसरा क्रमांक आर्या किशोर कदम(सिंधुदुर्ग) यांना प्रमाणपत्र, रोख रक्कम, टॉफी, व पुस्तके यांनी परिक्षण करणार्‍या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या तिन्ही स्पर्धकांना २५  जून रोजी होणार्‍या राज्यस्तरीय  स्पर्धेला निमंत्रित करण्यात आले आहे.*उत्तेजनार्थ क्रमांक* पराग राजेंद्र बदिरके(रायगड)अभिषेख शोभा सुरेश पाटील(रायगड)  सिद्धी सुभाष वेंगुर्लेकर(मुंबई)  यांना सुध्दा गौरविण्यात आले आहे. 

महा-अंनिसच्या विविध उपक्रम विभागातर्फे अतुल सवाखंडे , अनिल करवीर, नितीन राऊत व  गजेंद्र सुरकार यांची संकल्पना व नियोजन होते तर तांत्रिक बाजू मनोज डोमे सचिन थिटे यांनी सांभाळल्या. या अंनिसच्या अभिनव उपक्रमाचे सर्व स्थरातुन कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA