भिवंडीत खावटीचे अनुदान मिळण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे आंदोलन !

   शासनाकडून प्रत्येक लाभार्थीला चार हजार रुपये खावटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये दोन हजार रुपये बँक खात्यात जमा आणि दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देण्याचे जाहीर करण्यात आले. लाभार्थ्यांच्या खात्यात केवळ दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. मात्र  अजूनपर्यंत जीवनावश्यक वस्तू मिळालेल्या नाहीत. या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीवर एकाचवेळी मोर्चा काढून सदरील मागणीचे निवेदन ग्रामपंचयतीचे सरपंच, ग्रामसेवक यांच्याद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

  खावटी योजनेची अनुदानित रक्कम  लाभार्थ्यांपर्यंत पोहचलीच नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्यावतीने भिवंडी तालुक्यातील ६६ग्रामपंचायतीवर एकाच वेळी मोर्चे काढण्यात आले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने टाळेबंदीमुळे आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली.ही उपासमार रोखण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्यावतीने शासनाकडे सातत्याने खावटी योजनेचा लाभ देण्याची मागणी केली. तसेच ग्रामपंचायत स्तरावरील विविध मागण्याचे निवेदन देऊन शिष्टमंडळाने ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्याबरोबर चर्चा केली.यामध्ये घरकुल,गावठाण,वीज,पाणी,रस्ता तसेच घरपट्टी पती - पत्नीचे यांच्या संयुक्त नावे करावी, मासिक पाळी येणाऱ्या मुली व महिलांना ग्रामपंचायत मार्फत मोफत  सॅनिटरी पॅड वाटप करावे ही मागणी लावून धरली. संघटनेने केलेल्या या मागण्याचे जवळपास सर्वच ग्रामसेवक, सरपंच यांनी स्वागत करून या मागण्या येत्या दोन महिन्याच्या आत पूर्ण करू असे आश्वासन दिले.

दिलेल्या मुदतीत मागण्याची पूर्तता न केल्यास संघटना यापेक्षाही तीव्र आंदोलन करील असे भिवंडी तालुका अध्यक्ष सुनिल लोणे यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA