Top Post Ad

सरकार गरिबांचे, सर्वसामान्य जनतेचे नसून मूठभर श्रीमंतांचे

 काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार आज (७ जून)  मुंबई ठाण्यासह विविध ठिकाणी पेट्रोलदरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले  ठाण्यातील तीन पेट्रोल पंपावर प्रदेश काँग्रेसचे कायांध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष अँड. विक्रांत चव्हाण, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. ठाण्यातील कार्यकत्यांनी तत्त्वज्ञान विद्यापीठ येथील पंप तसेच विटावा पेट्रोल पंपावरही निदर्शने केली.  करोनाच्या निबघामुळे बेजार झालेली सर्वसामान्य जनता आता इंधनाच्या भरमसाठ वाढलेल्या दरामुळे अधिकच हैराण झाली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवर लावलेला कर कमी कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करत  काँग्रेस कार्यकत्यांनी निदर्शने केली.

 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील पेट्रोल पंपावर आंदोलनात सहभाग घेतला. प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, कोरोनाने दीड वर्षापासून लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे. उद्योगधंदे बंद आहेत, लाखो लोकांचे रोजगार गेले, कठीण परिस्थितीत लोक जगत असताना त्यात इंधन दरवाढ व महागाईने लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहनसिंग यांनी इंधनाच्या महागाईची झळ लोकांना बसू नये म्हणून दर स्थिर ठेवून जनतेला दिलासा होता. परंतु मोदी सरकार मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव कमी असतानाही भरमसाट कररूपाने लोकांच्या खिशावर दरोडे टाकून नफेखोरी करत आहे. 

 २०१४ मध्ये काँग्रेसचे सरकार असताना जागतिक क्रूड ऑइलचा दर प्रतिबॅरल १०४ रुपये होता. तरीही त्यावेळी तत्कालीन सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर ८० रुपये ठेवून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला होता. आता तर जागतिक क्रूड ऑइलचा दर ६३ रुपये इतका खाली आला तरीही केंद्र सरकारने हा दर १०४ रुपयांवर आणला आहे. सरकारने जो कर लावला आहे, तो कमी केला तर निश्चितच पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होतील. परंतु हे सरकार गरिबांचे, सर्वसामान्य जनतेचे नसून मूठभर श्रीमंतांचे आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. करोनाविरुद्धची लढाई लढताना लागू करण्यात आलेले निबँधांबरोबर पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. काँग्रेस आता गप्प बसणार नाही. आम्ही नेहमीच गरीब, सर्वसामान्य जनतेच्या बाजूने असून या दरवाढीविरोधात महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल असे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान  यांनी सांगिलले

देशातील इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसच्या वतीने राज्यातील एक हजार पेट्रोल पंपांवर सोमवारी आंदोलन करण्यात आले.  कोल्हापुरात गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तर चंद्रपुरात खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तसेच राज्यातील इतर शहरातही आंदोलन करण्यात आले. केंद्रातील मोदी सरकारने इंधनातील नफेखोरी थांबवून कोरोना संकटातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com