पहिल्याच पावसाने धारावीची दाणादाण

 मुंबई : पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली आहे. पहिल्याच पावसात मुंबई कशी तुंबली याचे अनेक  व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पावसाच्या जोरदार हजेरीमुळे  मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, धारावी, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे.  दरवर्षीच्या पावसाळ्यात हमखास पाणी साचून नागरिकांची प्रचंड गैरसोय होणाऱ्या  भागांपैकी एक म्हणजे धारावी परिसर. या वेळीदेखील धारावी परिसर नेहमीप्रमाणे  जलमय झाला आहे.  दोन ते तीन फूट पाणी भरल्याने येथील येथील नागरिक चक्क त्यात पोहत असल्याचे दिसत आहे.

    जी/उत्तर महानगर पालिका  व स्थानिक नगरसेवक , कॉन्ट्रॅक्टर ह्यांच्या संगनमताने धारावीतील नागरिकांना जलतरण तलाव उपलब्ध करून देण्यात आला असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.. नाले सफाईच्या नावाने लाखो रुपये खर्च करून काय साध्य होत आहे ,महानगरापलिका लोकांच्या पैशाचा अपव्यय करत आहे.  नगरसेवक आणि मनपा अधिकारी आपल्या मर्जीतल्या लोकांना  कामे देवुन फक्त कागदावर दरवर्षी नालेसफाई  १००% केली असे भासवून पैसे उकलतात. असा आरोपही धारावीकरांनी केला.  धारावीतील जनतेला  दरवर्षी पहील्या पाऊसातच घराघरात  जलतरण  अनुभवला जातो तरीही स्थानीक नगरसेवक व मनपा अधिकारी ह्याना जनतेच्या हिताचे काही  पडले नाही.. अशा नगरसेवक व मनपा अधिकारी ह्यांचा निषेध करावा तितका थोडा आहे. येणार्या मनपा निवडणुकीत जनता अशा नगरसेवकाना नक्कीच घरचा आहेर देईल अशा संतप्त प्रतिक्रिया धारावीतून उमटू लागल्या आहेत. 

.सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. पश्चिम द्रुतगती मार्ग व पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मुसळधार पावसामुळं दृष्यमानता कमी झाल्यानं वाहतूकीचा वेग मंदावला होता. मुंबई लोकल बंद असल्यानं नोकरदार वर्गानं रस्ते वाहतूकीचा पर्याय निवडला आहे. त्यामुळं महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA