Top Post Ad

रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी झळकावले नवी मुंबई विमानतळाच्या फलकावर दि.बा. पाटील यांचे नाव

  नवी मुंबई- आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरुन सध्या नवी मुंबईत वातावरण तापले आहे. या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव  देण्यात यावे यासाठी नवी मुंबई-पनवेल व उरण भागातील प्रकल्पग्रस्त एकवटले आहेत. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांकडून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या लढयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने देखील उडी घेतली असून नवी मुंबईतील रिपब्लिकन  कार्यकर्त्यांनी बुधवारी भर पावसात कळंबोली-उरण महामार्गालगत सिडकोच्या वतीने लावण्यात आलेल्या नवी  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फलकावर प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव झळकवून विमानतळाचे नामकरण केले. 

रिपब्लिकनचे युवा नेते अँड.यशपाल ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे, महिला अध्यक्षा शिलाताई बोधडे, विशाल कांबळे, बाळू गायकवाड, इम्रान शेख, रणधीर मखरे, रमेश खिलारे, सुशांत ओहोळ, महेश लंकेश्वर आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले हेते. नवी मुंबईतील नियोजित विमानतळाला  दि.बा. पाटील साहेब यांचे नाव देण्यात यावे यासाठी रिपब्लिकन कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा इशारा ही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. 

  ठाण्यातील कळवा नका येथे नवी मुंबई राष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येत्या २४ जूनपर्यन्त याबाबत योग्य निर्णय न झाल्यास सिड़कोला घेराव घालण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.  लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी यापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आलेली आहे. तरी देखील अचानकपणे 17 एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी ओबीसी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हे सारे प्रकल्पग्रस्त तसेच सामाजिक व राजकीय संघटना आजच्या मानवी साखळी आंदोलनात सहभागी झाले होते. दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याच्या मागणीसाठी अनेक पत्रे देण्यात आली. बैठकांचे आयोजन करण्याविषयी सिडको प्रशासन, मंत्री आणि राज्य शासनाला विनंती करण्यात आली. मात्र भेटीगाठी न दिल्याने कृती समितीला आजचे हे आंदोलन करावे लागले, अशी माहिती दशरथ पाटील यांनी दिली

   पेणचे आमदार रविंशेठ पाटीत यांबो पेण येथे झालेल्या साखळी आंदोलनात नवी मुंबई  येथील विमानंतळाता भूमिपुत्र व लोकनेते दि: बा.पाटील यांचे नाव द्यावे अशी आग्रही मागणी केली. यावेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील, वैकुंठ पाटोल, गटवेते अनिरुद्ध पाटील, उपबगराध्यक्षा वैशाली कडू, तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, सरपंच पूजा पाटील, गोरख पाटील, अशोक पाटील, भास्कर पाटील यांसह पेण पालिकेचे नगस्सेवक, नगरसेविका व पेण मधील वागरिक उपस्थित होते. आमदार रविशेठ पाटील  यांच्या निवासस्थाना पासून तहसील कार्यालयापर्यंत हे साखळी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी मार्गदर्शन करतावा रवीशेठ पाटील म्हणाले की ज्या व्यक्तीने स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांच्या आंदोलन व प्रयत्नांमुळेच आज येथील शेतकऱ्यांना साडेबारा टक्‍के भूखंड मिंळात्ता. आश्या अहोरात्र कष्ट घेणाऱ्या व्यक्तीचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिलेच पाहिजे अशी भूमिका रवीशेठ पाटील यांनी घेतली. नवी मुंबई उभारतावा स्थाविक शेतकरी, प्रकल्पग्रस्त, मिंठागर कामगार ओबीसी जनता यांच्यासाठी दि.बा.पाटील यांनी आंदोलन करून त्याना न्याय व हक्क मिळवून दिला. सामान्य जनतेसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. अशा झुंझार व लढवय्या वेत्याचे वाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे यासाठी हे साखळी आंदोलन करण्यात असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी यावेळी दिली. आंदोलन आंदोलनकर्त्यांच्या शिंडमंडळाने तहसील कार्यालयात निवेदन देऊन शासनाकडे नवी मुंबई विमानतळाला दि. बा.पाटील यांचे वाव लावण्याची लेखी मागणी केली


विमानतळाच्या नावाच्या लढ्याचे शंख फुंकून राज्यातील आंदोलनाचे आक्रमकपणे ठोस उत्तर दिले आहे आपण. लढ्यात  तीन पिढ्या सहभागी झाल्या होत्या. ज्यांनी प्रत्यक्षात दिबांसोबत काम केले आहे ती एक पिढी, ज्यांनी दिबा नावाचा करिष्मा केवळ वाचला आहे, ऐकला आहे ते आणि ज्यांना दिबा या नावाशिवाय काहीच माहीत नाही, पण आमचे दैवत आहे या भावनेने लढ्यात उतरून दिबा नावाच्या योद्ध्याला मानवंदना दिलीत, त्याबद्दल समाज ऋणी आहे.-  कांतीलाल कडू
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com