जिल्ह्यातील एकही बालक वंचित राहणार नाही- मंत्री यशोमती ठाकूर यांची ग्वाही


 अनाथ बालकांसाठी 5 लाखाची मदत
जिल्ह्यातील एकही बालक वंचित राहणार नाही
आर्थिक आधारा सोबत बालकांना भावनिक आधार गरजेचा
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचा ठाण्यात अनाथ बालकांसोबत संवाद

ठाणे - ज्या बालकांचे पालक कोरोना काळात मयत झाले अशा बालकांना सर्व प्रकारचे सहाय्य शासन करणार असून अशा बालकांना 5 लाखाची मदत शासन देणार असल्याचे .  महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर  यांनी सांगितले महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ठाणे जिल्ह्यातील अनाथ  बालकांशी  मायेचा संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हापरिषदेतील इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.  तसेच अनेक अंगणवाडी सेविका, मदतनिस यांचीही उपस्थिती होती.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना ठाकूर म्हणाल्या,  प्रत्येक बालकांना पुनर्रस्थापित करण्यासाठी टास्क फोर्सच्या माध्यमातून  बालकांना सहकार्य करण्यात येत आहे. बालकांचे शिक्षण कशा प्रकारे पूर्ण करता येईल यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीची स्थापना करण्यात आली आहे. अनाथ बालकांचे सर्वेक्षण सुरु आहे. एकही बालक वंचित राहणार नाही. ज्या बालकांच्या डोक्यावरुन आई-वडीलांचे छत्र हरपले आहे अशा बालकांना आधार देण्याची आवश्यकता आहे. बालकांच्या विकासासाठी असलेला बालसंगोपनचा निधी देखील वाढविण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने पिडीत बालकांच्या सातत्याने संपर्कात राहणे गरजेचे आहे. बालकांना भावनिक आधाराची गरज असते  त्यामुळे अशा बालकांना प्रथम भेटून त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या या समस्या सोडविण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न करण्यात येणार आहेत.  ठाणे जिल्ह्यात सध्यास्थितीत आई-वडील कोरोनाने मयत झाले आहेत  अशा बालकांची संख्या 42 आहे. जिल्ह्यामध्ये अजून बालकांच्या तपासणीचे काम चालू असून पिडीत बालकांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले  यांनी सांगितले.

------------

बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प ठाणे-१ यांनी दिनांक १९ मार्च रोजी ठामपा स्थावर मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त यांच्या कडे अंगणवाडीकरिता जागेची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचा सकारात्म विचार व्हावा याकरिता महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर  यांना ठाणे शहर विधानसभा युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस. प्रविण जगदीश खैरालिया यांनी निवेदन दिले अंगणवाडी क्र. ८२ ही ठाण्यातील खारटण रोड येथील सफाई कामगारांच्या वस्ती मध्ये आहे. सदर अंगणवाडी मध्ये लहान मुले, गरोदर स्त्रिया, किशोरवयीन मुली यांना आहार, आरोग्य, लसीकरण व पूर्व प्राथमिक शिक्षण आदी सुविधा पुरविण्यात येतात. आताची जागा ही भाडेतत्त्वावर असल्याने ती खाली करावी लागेल. दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील ठाणे महापालिकेच्या मालकीच्या एका गाळ्याची जागा सफाई कामगारांच्या मुलांसाठी व गरोदर स्त्रियांना सुविधा उपलब्ध करून देणे साठी सफाई कामगारांच्या वस्ती मध्ये अंगणवाडी चालवणे ही ठाणे महापालिकेची देखील जबाबदारी आहे. तरी आपण ठाणे महापालिका प्रशासनाला योग्य ते निर्देश देवून स्टेडियम मधील एक गाळा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी खैरालिया यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA