Top Post Ad

लोक म्हणतात धर्म आणि जातीवाद करू नका

विशिष्ट पक्षात काम केल्याने, किंवा जेवण एकत्र केल्याने काहींना वाटते आपण एकदम जात आणि धर्म न मानणारे नी धर्मी, जात पात न मानणारे झालो आहोत.असं होऊ शकत....मराठा, कुणबी, अश्या उतरंडी जातींचे कार्यकर्ते, नेते अशा अविर्भावात बोलतात जसे त्यांचा खूप जाती धर्माचा अभ्यास आहे.बोलताना ते सहज बोलून जातात बघा "आम्ही कुठें जात धर्म मानतो. मी कोणा बरोबरही जेवतो. खातो पितो."जसे काही हेच धर्म संस्थापक आहेत किंवा जाती यांनी निर्माण केल्या. जे आता ते तोडतायत.खालचे उतरंडी जाती आणि धर्माचें लोक हे विसरतात की आमच्या डोक्यावर या जाती धर्माच्या निर्मिती करणारी स्पेशल जात आमच्या डोक्यावर कायम बसलेली आहे.

तर लेका तुझ्या अश्या मानण्या न मानन्याला विचारतो कोण? आणि त्याला मान्यता देतो कोण?वेळ आल्यावर झक मारून तुझ्या डोक्यावर बसलेल्या बापाला तुला बोलवावेच लागते.आपल्या घरात पोराचे नाव ठेवायला, गृह प्रवेश, गणपतीला, लग्नाला,मुहूर्त काढायला,सत्यनारायण, मृत्यू विधिला त्यांना बोलावून नतमस्तक होऊन दक्षिणा द्यावीच लागते. जरी तुमच्या राजे आणि संतांचे त्यांनी खून पाडले तरी....... आपली सुटका नाही. यांनी शिवबा, संभाजी, संत तुकाराम, संत चक्रधर, बसेश्वर, आताचे दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांना नाही सोडले. तू किस झाड की मुली हैं..?

यातून राजकारणी ही सुटले नाही. धर्म निरपेक्ष पक्षांचे लोकही संविधान बाजूला ठेऊन सरकारी उदघाटन करण्यासाठी काय करतो आपण... ब्रिज उदघाटन,पाया भरणी, नवीन कार्यालय करताना हा ना लायक पणा केला जातो. कार्यालयात जाती धर्माचा संस्थापक वंशज देव आणि धर्माचें फोटो लावत नाही तर हे खालचे उतरंडी जातींचे लोक आणून लावतात.ऐक मराठा मंत्री असा होता. तो सरळ म्हणायचा या मागासवर्गीय (विशिष्ट )लोकांची कामे माझ्या कडे आणू नका.मी जात आणि धर्म मानत नाही असे म्हणणाऱ्या लोकांची खरी वेळ येते ती मुलीच्या लग्नाच्या वेळेस. मुलगा असेल तर कधी कधी चालवून घेतात. मुलगी असली आणि जाती बाहेर मुलगा पहिला की हे जात धर्म मानत नाही म्हणणारे लोक यांचा खरा चेहेरा समोर येतो. तेथे संघर्ष सुरु होतो. सैराट....

पूर्ण कुटुंब, नातेवाईक, जात भाई त्या मुलीच्या विरोधात लढाईच्या संघर्षात उभे ठाकतात. मुलगी मुलगा पुरून उरला तर ठीक अन्यथा जिवच घेतला जातो. किंवा मुला मुलीच्या घरच्याना ती वस्ती काय शहर सोडून जायला भाग पाडले जाते.असे अनेक उदाहरणं माझ्या कडे आहेत. त्यांनी मुलाला त्यांच्या कुटुंबासह कॉलनी, घर सोडायला लावली.मराठा लोकांना 75 वर्ष लागली समजायला. की आपणही मागासवर्गीय आहोत.आता हे उतरंडी वरच्या जातींना... कुणबी आगरी कोळी माळी साळी तेली लोहार न्हावी शिंपी सोनार वंजारी बंजारी यांना अजूनही वाटत नाही आपण मागासवर्गीय आहोत.(निवडणूक आल्या नौकऱ्या आल्या की हे मागासवर्गीय होतात )आता तर आदिवासी आणि मेहेतर पण श्रेष्ठ जातींचे समजायला लागलेले आहेत.

तर बघा आपल्या छातीवर हात ठेऊन आम्ही खरंच जात आणि धर्म निरपेक्ष आहोत का??? माझ्या डोक्यात माझाच मेंदू आहे का? माझ्या धडावर माझेच डोके आहे का?
बघा खात्री करा. पण खरं आणि प्रामाणिकपणे बोला.
जय शिवराय!!      जय भीम!!

पत्रकार बाबा रामटेके
8097540506/17/मे/2021

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com