जय जय महाराष्ट्र माझा गीताचे बहु बोलींचे मराठीतील ई-पुस्तक प्रकाशित

 माझी मायबोली  व्हाट्सएप समूहाने केले जय जय महाराष्ट्र माझा- या गीताचे बहु बोलींचे मराठीतील  ई-पुस्तक प्रकाशित

शहापूर  

१ मे महाराष्ट्र दिन , या दिवशी १९६० रोजी अखंड महाराष्ट्राची  निर्मिती झाली. महाराष्ट्राचे गुणगान गाणारे गीत “ जय जय महाराष्ट्र माझा ” कवी राजा नीलकंठ बढे यांनी रचले, या गीताचे महाराष्ट्रातील बोलल्या जाणाऱ्या विविध बोलींमध्ये सर्वप्रथम अनुवाद होत आहे. हि इतिहासात नोंदवण्यासारखी बाब आहे.  माझी मायबोली या व्हाट्सएपच समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राचे गौरव करणारे गीत " जय जय महाराष्ट्र माझा" या गीताचे बहु बोलींचे मराठीतील ई- पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या ई- पुस्तकाचे स्वागत महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रीय जनता नक्की करतील. - 

          “ माय बोलीतील शब्दात संस्कृती आणि निसर्ग संवर्धनाचे अर्थ असतात. माय बोली आणि प्रादेशिक बोली ह्या तेथील राज्य भाषेच्या आधार असतात थोडक्यात यांत शब्दांच्या  नवनिर्मितीची उपज असते, जर या माय बोली आणि प्रादेशिक बोली नष्ट झाल्या तर राज्य भाषेतील शब्द साठा कमी होऊन, शब्दांची मर्यादा घटतील म्हणून माय बोली आणि प्रादेशिक बोली महत्वाच्या आहेत. उदाहरण अर्थ - एके काळी मोटार सायकल गावो गावी नव्हती आणि त्यामुळे तिला काय म्हणतात हे माहित नव्हते म्हणून, एका गावातून रस्त्याने जात असणाऱ्या मोटार सायकलचा “ फट-फट-फट ” आवाज ऐकून या मोटार सायकलला नाव पडले “ फटफटी ” एक नवीन शब्द मराठी बोली भाषेला मिळाला. अशी अनेक उदाहरणे आहेत कि ज्यामुळे स्थानिक , प्रादेशिक , माय बोलींचे महत्व आहे. म्हणून माय बोलींचा अभ्यास त्यांच्या शब्दांचे बोलीसह संग्रह, संवर्धन करणे गरजेचे आहे. 

           “ माझी मायबोली ” साधारण जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात निर्मिती झाली, तत्पूर्वी मराठी कवितांचे ऐराणी बोलीतील अनुवाद करण्याचे हौशी आनंदी छंद जोपासण्याचे कार्य नितीन खंडाळे (चाळीसगाव) गेली ३ वर्षापासून करत आहेत, सद्या व्हाट्सएप आणि फेसबुक च्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध काना कोपऱ्यातील एकूण ३० च्या जवळपास माय बोलींचा समावेश या समूहात अनुवादकांच्या सहाय्यने झाला आहे. “ मानकरी ” बोली अशा माध्यामतून जोडली गेली, अशा अनेक माय बोली असतील ज्या लवकरच या समूहाला जोडल्या जातील असा विश्वास  समूहाने व्यक्त केला.   महाराष्ट्र दिनानिमित्त “ जय जय महाराष्ट्र माझा ” या गीताचा अशा विविध बोलींमधून अनुवाद केला आहे आणि तो ई- पुस्तक स्वरुपात प्रकाशित केला आहे. याच प्रकारे भविष्यात बालभारती मधील इयत्त १ ली ते १० वी पर्यंतच्या वर्गाच्या मराठी कवितांचे माय बोली मध्ये प्रायोगिक तत्वावर हौशी प्रयोग करण्याचा मानस आहे. महाराष्ट्रातील मायबाप जनता नक्की या उपक्रमाचे  स्वागत करतील अशी अपेक्षा देखील समूहाने व्यक्त केली. 

 "आमच्या समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेवटच्या घटका मोजत असणारी, ज्या बोलीची आजपर्यंत कुठेही नोंद नसणारी “ मानकरी ” बोली जोडली गेली आहे याचा आनंद आहे. आणि अजूनही वेगवेगळ्या भागातील बोली भविष्यात जोडल्या जातील असा विश्वास आहे.”_  –( रोहिदास डगळे, सदस्य माझी मायबोली व्हाट्सएप समूह)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA