‘ड्राइव्ह इन’ सुविधेतंर्गत लसीकरणाचा दुसरा डोस देण्यास सुरुवात


 महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आज ठाणे ग्लोबल हॅास्पिटलला भेट देवून मृत्यू दर कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना आणि आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले.  आयसीयू कक्षामध्ये तज्ज्ञ डॅाक्टरांची आवश्यकता असल्यास ते तातडीने नेमण्याच्या सूचना त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिल्या. तसेच आयसीयूमध्ये आणि व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रूग्णांची विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर औषधांची उपलब्धता, ॲाक्सीजनचा पुरवठा याचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला. तसंच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लहान मुलांसाठी 100 खाटांचा स्वतंत्र कक्ष निर्माण करणे, तज्ज्ञ डॅाक्टर्स, आवश्यक असलेल्या औषधांची खरेदी करणे, ॲाक्सीजनचा पुरवठा आदींची तयारी करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. 

 दरम्यान विवियाना मॉलच्या पार्किंगमध्ये ‘ड्राइव्ह इन’ सुविधेतंर्गत नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना महापौर आणि महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत आज लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला. विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये ‘ड्राईव्ह ईन’ लसीकरण सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेतंरेगत रोज नोंदणीकरण केलेल्या १०० ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ दुसरा डोस देण्यात येणार आहे. हे लसीकरण दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात येणार आहे. ही सुविधा ६० वर्षांवरील नागरिकांसाठीच असून लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून फक्त दुसऱ्या डोसच या केंद्रावर घेता येणार आहे. तसेच लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे. या केंद्रावर नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस देण्यात येणार असून पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad