पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ

  शहापूर 

: कुंडन येथील आदिवासी कातकरी  कुटुंबांनी त्यांच्या शिधा पत्रिका ऑन लाईन नोंदणी करण्यासाठी ९ जुलै २०२० रोजी कागदपत्रे शहापूर तहसील कार्यलयातील पुरवठा विभागात जमा केली होती. मात्र पुरवठा विभागाच्या बेजबाबदार कर्मचाऱ्यांनी त्या शिधा परत्रिकांची ऑन लाईन नोंदणी केली नाही. त्यामुळे कुंडन येथील आदिवासी कातकरी कुटुंबांना तीन महिन्यांपासून रास्त भाव धान्य दुकानातून धान्य मिळत नसल्याने येथील कातकरी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मागील वर्षीच्या टाळेबंदी काळात कुंडन येथील कातकरी वस्ती मधील गरिब  कुटुंबाना अंत्योदय योजनेच्या शिधा पत्रिका मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना मागील वर्षी  जगण्यासाठी लागणारे धान्य रास्त भाव धान्य दुकानात मिळत होते. दरम्यान कुंडन येथील आदिवासी कातकरी  कुटुंबांनी त्यांच्या शिधा पत्रिका ऑन लाईन नोंदणी करण्यासाठी ९ जुलै २०२० रोजी कागदपत्रे शहापूर तहसील कार्यलयातील पुरवठा विभागात जमा केली होती. मात्र पुरवठा विभागाच्या बेजबाबदार कर्मचाऱ्यांनी त्या शिधा परत्रिकांची ऑन लाईन नोंदणी केली नाही. त्यामुळे येथील कातकरी कुटुंबाकडे पिवळ्या रंगाच्या शिधा पत्रिका असतानाही मागील तीन महिन्या पासून कुंडन गावातील १५ कुटुंबावार उपासमारीची वेळ आली आहे. या कुटुंबाना ऑन लाईन मिळावे यासाठी श्रमजीवी संघटने २६ एप्रिल रोजी पत्रव्यवहार  देखील केला होता. परंतु  आज पर्यत त्यांना धान्य मिळाले नाही तसेज  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेले धान्य सुद्धा या कुटूंबांना मिळणार नसल्याचे शिरोळ येथील रास्त भाव दुकानदाराने सांगितले आहे. 

ताळेबंदीच्या काळात आदिवासी कातकरी कुटुंबाना रोजगार नाही, त्यांच्या हाताला कुठलेही काम नाही आणि पिवळी शिधा पत्रिका असूनसुद्धा धान्य देखील मिळत नाही.त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून या कुटुंबाना कोरोनामुळे मृत्यू येईल की नाही हे माहीत नाही परंतु उपासमारी मुळे नक्की आम्ही मरू अशी केविलवाणी हळहळ येथील कातकरी व्यक्त करत आहेत.  अशीच परिस्थिती शहापूर तालुक्यातील लाहे , जांभुळवाड, जुनवणी,भातसई, मढ, मासवणे, शेरे, साने, बामनपाडा येथील ४५५ पेक्षा जास्त शिधा पत्रिका धारकांची आहे. परंतु बेजबाबदार शहापूर पुरवठा विभाग आणि सरकारी यंत्रणा या बाबीकडे कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे. अशी खंत श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव प्रकाश खोडका यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad