धारावीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट

   धारावी -  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील पहिल्या लाटेप्रमाणे सर्वाधिक प्रसार होणाऱ्या धारावीत आता कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं समोर येत आहे . गेल्या काही दिवसात कमी रुग्ण आढळत असल्यामुळे प्रशासनाने निश्वास सोडला आहे . धारावीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६६६२ इतकी आहें. त्यापैकी ५७०२  रुग्ण बरे झाले आहेत . तर सध्या धारावीत सक्रिय रूग्णांची संख्या ६१६ इतकी  आहे. धारावीत 8 मार्चला 18 रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ  होत होती 11 एप्रिलला धारावीत 76 नवे रुग्ण आढळून आले होते. पण आता पुन्हा ही संख्या कमी होऊ लागली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून उपचाराअभावी अनेक लोकांचा मृत्यू होत  आहे. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. याचे काटेकोर पालन धारावीकर करत असल्यानेच हे शक्य झाले असल्याचे मत येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल शिवराम कासारे यांनी व्यक्त केले.

धारावीत गेल्या ९३ दिवसात फक्त २१७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या चार  दिवसात तिसऱ्यांदा धारावीत केवळ ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता धारावीतील कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.  आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  धारावीत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे . कारण मागील महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसाला ७० हुन अधिक रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे . गेल्या १३ दिवसात २१७ रुग्णांची नोंद झालीय . तर  गेल्या चार दिवसात तिसऱ्यांदा ९ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे धारावीतील कोरोना आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे . 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad