खोपट एस टी बस स्थानकातील चालक, वाहक आणि कर्मचा-यांना लॉकडाऊन काळात ' समतोल ' आहार


 कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून अनेकदा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची जेवणाची गैरसोय होते. सकाळी लवकर घराबाहेर पडल्यामुळे घरून डबा आणणे शक्य होत नाही. .  त्याच अनूषंगाने  खोपट एस टी बस स्थानकातील चालक, वाहक आणि कर्मचा-यांना या लॉकडाऊन काळात समतोल फाउंडेशनच्या वतीने  मोफत समतोल आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. समतोल फाउंडेशनच्या वतीने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता मोफत टिफीन सेवा सुरू करण्यात आली असल्याचं संस्थेचे विश्वस्त आमदार संजय केळकर यांनी सांगितले 

नोंदणी केलेल्या ५० कर्मचाऱ्यांना ही सेवा पुरविण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे तर काही जण आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य एकनिष्ठेने पार पाडत आहेत, अशा लोकांना मदतीचा हात म्हणून एस टी कर्मचाऱ्यांना ही सेवा पुरवण्यात येत असल्याचे केळकर म्हणाले, यापूर्वी फाउंडेशनच्या माध्यमातून सिव्हिल रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर यांच्याकरिता जेवणाची तसेच एनर्जी ड्रिंकची व्यवस्था केली असून हायवेवरील ट्रक चालकांसाठी ही या संस्थेच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केली आहे. यावेळी संस्थेचे कार्यकर्ते तसेच खोपट एस टी बस स्थानकाचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या