Top Post Ad

महापुरुषांची बदनामी ... प्रस्थापित व्यवस्थेविरोधात लढणाऱ्यांचे खच्चीकरण


  
काँग्रेसच्या  टिळकांपासून भाजपाच्या नायडू पर्यंत सर्वांच्या डोळ्यात छत्रपती शिवराय खुपत होते, सलत होते, म्हणूनच  की काय जे पोटात तेच ओठावर याप्रमाणें त्यांनी वेळोवेळी गरळ ओकली आहे. ज्यांनी ज्यांनी शिवरायांची तसेच इतर बहुजन  महापुरुषांची बदनामी केली , त्यांचा उद्देश महापुरुषांची बदनामी करणे कधीच नसतो , तर  त्या महापुरुषांना आदर्श मानून वर्तमानकाळात ज्या चळवळी, संघटना, व्यक्ती प्रस्थापित व्यवस्थेविरोधात लढतात त्यांना दडपून टाकणे,त्यांचे मनोबल खच्चीकरण करणे हा उद्देश असतो .

बाळ गंगाधर टिळक- " शिवाजीला क्षत्रियत्वाची आम्ही तात्पुरती सवलत दिली होती . तुम्ही खुशाल स्वतःला उच्चवर्णीय समजा ,पण तुम्ही #शुद्रच आहात , वैदिक मंत्राने संस्कार झाल्याने ब्राह्मण आणि मराठे एका स्तरावर येणार नाहीत. " ( २२,२३ ऑक्टोबर १९०१ केसरीत - वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांना उद्देशून )

विनायक दामोदर सावरकर- " काकतालीय योगाप्रमाणे ( म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला ) शिवाजी राजा झाला . नाहीतरी त्याची योग्यता नव्हती . " 

" नेतृत्व चालविण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला संभाजी महाराजांमध्ये रागीट स्वभाव व मदिरा आणि मदिराक्षी यांच्या विषयी अत्यंत आसक्ती या दुर्गुणांची भर पडली होती. " 

जवाहरलाल  नेहरू - नेहरू आपल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया पुस्तकात शिवाजी महाराजांना #Misguided_Patriot- "वाट चुकलेला देशभक्त" म्हणतात . 

आता नेहरू तर जिवंत नाहीत , तर त्यांच्या वर्तमान वारसदार सोनिया नेहरू (गांधी) , यांना आम्ही सांगू इच्छितो, आमच्या छत्रपतीनं मध्ययुगीन भारतात राजेशाहीत लोकशाही नांदवली होती, तुमचे पूर्वज जवाहरलाल यांनी आधुनिक भारतात लोकशाहीत ब्राह्मणशाही निर्माण केली , त्यामुळे त्यांना काय कर्तृत्व कळणार आमच्या राजाचं. बहुतेक नेहरूंना त्यांच्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या हजारो वर्षांच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर, ब्राह्मणवादी व्यवस्थेवर शिवरायांनी जे वार केले होते ते सलत असावेत .

आता जेम्स लेन प्रकरणात तर राजकारणातील हिंदुत्ववादी + भाजपा-सेना , धर्मनिरपेक्षवादी + काँग्रेस आणि पुरोगामी + राष्ट्रवादी म्हणून आपल्या आजूबाजूला वावरत असलेल्या या सगळ्या #शिवद्रोह्यांचा खरा चेहरा उघडा पडला.

जून २००३ ला अमेरिकन लेखक जेम्स लेन लिखीत " हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया " या पुस्तकात अतिशय खालच्या पातळीवर जाऊन छत्रपती शिवाजी, माँ जिजाऊ यांची बदनामी केली .

१ सप्टेंबर २००३ या दिवशी जनता बँक व्याख्यानमाला, सोलापूर येथे बळवंत पुरंदरे ( ज्याला मीडिया बाबासाहेब पुरंदरे म्हणते ) जेम्सलेनच्या या पुस्तकाचे तोंडभरून कौतुक करतो .

याच बळवंत पुरंदरे या माणसाने "राजा शिवछत्रपती" पुस्तक लिहून त्यात शिवचारित्राच्या नावाखाली मराठा समाज आणि मराठा स्त्रियांची बदनामी केल्याबद्दल कोल्हापूर मध्ये एक कोटीचा दावा आणि पुण्याच्या शिवाजी नगर कोर्टात केस चालू आहे .

जेम्स लेनला मदत करणार मूळ केंद्रस्थान ही पुण्यातील " भांडारकर संस्था " आहे हे समजल्यावर संभाजी ब्रिगेडच्या ७२ मावळ्यांनी भांडारकर फोडलं.

जेम्सलेनला फरफटत भारतात आणतो म्हणणाऱ्या आर. आर. पाटलांनी काय केलं ? तर या बळवंत पुरंदरेला आणि पुण्यातील भांडारकरमधील जेम्स लेनचे ब्राह्मण साथीदार यांना संरक्षण पुरवले आणि त्या ७२ मावळ्यांवर कारवाई केली . काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने पुरंदरेला संरक्षण दिले तर त्याच पुरंदरेला भाजपा-सेनेने महाराष्ट्रभूषण आणि पदमविभूषण दिला . शिवरायांची बदनामी करण्यात दोन्हींची चढाओढ आपल्याला पाहायला मिळते.  ज्याप्रमाणे मागच्या निवडणुकांत भाजपाने "चला छत्रपतीचा आशीर्वाद देऊ मोदीला साथ" , अस म्हणत शिवरायांच्या नावावर सत्ता मिळवली , अगदी त्याचप्रमाणे २००४ ला काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवरायांच्या बदनामीचे भांडवल करून सत्ता हस्तगत केली होती.

राज ठाकरे, जे म्हणाले होते ,शिवद्रोही बळवंत पुरंदरेच्या केसाला जरी धक्का बसला तर अख्या महाराष्ट्रात तांडव करीन.  हे तेच राज ठाकरे आहेत श्रीकांत बहुलकरची माफी मागणारे . आता हे श्रीकांत बहुलकर कोण ? जेम्स लेनचा दुसरा एक सहलेखक श्रीकांत बहुलकर याला तत्कालीन मराठा महासंघ आणि पुण्यातील संवेदनशील शिवसैनिकांनी काळे फासले . तेंव्हा त्या श्रीकांत बहुलकरची राज ठाकरेंनी माफी मागितली होती . हे तेच राज ठाकरे आहेत ज्यांनी संभाजीराजांच्या बदनामीत भरच टाकली , यांच म्हणणं होतं की संभाजी राजे हे मोघलांना फितूर झाले होते , संभाजी राजेंना राज ठाकरेंनी गद्दार ठरवलं . आता पुरंदरेला गुरु मानल्या नंतर यांच्या कडून दुसरी तरी काय अपेक्षा असणार आहे .

अटलबिहारी_वाजपेयी - १६ जानेवारी, २००४ मुंबई येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात हे बिहारी म्हणाले की, जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी चुकीची आहे , हे ऐकून सुध्दा तेथे उपस्थित बाळ ठाकरे शांतच होते. पण संभाजी ब्रिगेडचे मावळे शांत नाही बसले त्यांनी २० मार्च २००४ , बीड मधील वाजपेयीची सभा उधळली.

लालकृष्ण_आडवाणी - १६ मार्च, २००४ रोजी लालकृष्ण आडवाणीने जेम्स लेनच्या पुस्तकाचे समर्थन केले, त्याच दिवशी #छावा संघटनेतील छाव्यानी उमरग्यात ( उस्मानाबाद) आडवाणीचे धोतर पिवळे केले , शेवटी आडवाणीला माफी मागावी लागली .

देवेंद्र_फडणवीस- शिवरायांच्या मृत्यूदिनी रायगडावर ढोल ताशा नगारे वाजवतो. शिवरायांची बदनामी करणाऱ्या  बळवंत पुरंदरेला महाराष्ट्रभूषण पुरस्कार देतो . गडकिल्ले भाड्याने देतो .

आता आपल्या लक्षात आलंच असेल ,काँग्रेस , हिंदू महासभा ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,राष्ट्रवादी काँग्रेस, एकूणच डाव्या ,उजव्या, हिंदुत्ववादी ( ब्राह्मणवादी ) , धर्मनिरपेक्षवादी म्ह्णून वावरणारे , सत्ताधारी आणि विरोधी म्हणवले जाणारे एकूणच महापुरुषांच्या बदनामीबाबत आतून एकच आहेत . या सर्वांनीच आपल्या महापुरुषांचा वापर वेळोवेळी केलेला आहे, आता इथून पुढं यांना आपला आणि आपल्या महापुरुषांचा वापर करू द्यायचा की नाही हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपल्याला #जागृत राहावं लागेल , शत्रू आणि मित्राची ओळख करून घ्यावी लागेल, त्यासाठी जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवावा लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com