मुंबईला "बाई" व अहमदाबादला "मॅडम" बनवण्याचा कट !

 

   १०५ जणांना कंठस्नान घालणारा गुजरात आज अख्खी मुंबईच तळाखाली घालत आहे.  मुंबई गुजरातची कधीच होणार नाही हे लक्षात आल्यावर भाजप प्रणित आरएसएसच्या मोदींनी मुंबईचे लचके तोडायला सुरवात केली. आतापर्यंत हजारो कंपन्या, राष्ट्रीय स्तरावरचे उद्योग कार्यालये हलवली आहेत.  हे हलवण्यासाठी महाराष्ट्राचा अनाजी दत्तो म्हणजे ??????  वापरला आहे. मुंबईचा विकास बंद करुन ती भकास बनवण्याचे षडयंत्र २०१४ पासुन सुरु झाले आहे. अब्जावधींचा हिरे व्यापार केव्हाच गुजरातला ट्रान्सफर झाला आहे.  मुंबादेवीला सोडून अहमदला भजत आहे. म्हणे हिंदुत्ववादी ?. मुंबई महाराष्ट्राचीच नव्हे, तर भारताची आर्थिक राजधानी आहे.

     ती ओळखच पुसुन टाकायची योजना कपटी भाजप प्रणित आरएसएसच्या मोदीने आखली आहे. त्याला महाराष्ट्रातले गद्दार साथी बनले आहेत. हेच सहन न झाल्यामुळे उद्धव ठाकरेंनी गुजरात हिताचे प्रकल्प धडाधड बंद केले. म्हणुन तर चमच्यांचा तीळपापड होत आहे. उद्धवाचे सरकार पाडण्यासाठी सध्या रंभा उर्वशी कामाला लावल्या आहेत. त्या यशस्वी होण्यासाठी काही मुरळ्या सोडल्या आहेत.  पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ज्याने औरंग्याची कबर इथे खोदली हे गुजरातच्या बेण्याने विसरू नये.

     पाच वर्षात एक छदाम शेतक-यांचे कर्ज कमी नाही केले. उद्धव ठाकरेंनी कसलाच गाजावाजा न करता २८००० कोटी कर्ज माफ केले तसे सातबारे घरोघरी पोहचते केले. दोन कोटी नोक-या देणारे कावळे गायब झाले पण उद्धवाने मेगा भरती सुरु केली. राज्याचे करोडो रूपये मोदीने बुडवले तरी राज्याला सक्षम आरोग्यसेवा पुरवली. कोविडमुळे राज्य आर्थिक संकटात असताना देखील पगार वेळेवरच केला.  मित्रांनो मुंबई महाराष्ट्राची शान आहे, कायमची भाकर आहे. आज मुंबईमुळेच नोकरदारांचा पगार होतो.

     तुम्हांला माहीत नाही. हे पहा, बीड जिल्ह्याचा मासिक पगार १७९ कोटी आहे आणि बीड जिल्ह्याचे महसुली वार्षिक उत्पन्न केवळ १७२ कोटी आहे. २२०० कोटी मुंबई देते. हे वास्तव आहे. कुठेही चौकशी करा. जर मुंबई कमकुवत झाली तर महाराष्ट्र कर्मचा-याचा पगार देखील करु शकणार नाही. जर अणाजी दत्तोची पिलावळ पुन्हा सत्तेत आली तर अख्ख्या महाराष्ट्राचा शनि शिंगणापुर होईल हे नक्की. 

मुंबईला भिखारी बनवण्याचे अमित अब्दालीचे स्वप्न धुळिस मिळवण्याची गरज आहे. भाजपचा मोदी हा भारताचा नाही, गुजरातचा पंतप्रधान आहे.  सर्व आतंरराष्ट्रीय नेत्यांना मुंबई ऐवजी अहमदाबादलाच नेले. ओबामा आणला गुजरातला नेला, ट्रंप आणला गुजरातला नेला, शिजो अबे आला गुजरातला नेला, चीनचा अध्यक्ष आणला अहमदाबादेत नेला.  या आधी असं कधीच झालं नाही. जगातील नेत्यांनी कायम मुंबई पसंत केलेली आहे अन् हे शकुनी त्यांना हिडींबे कडे घेवून जातंय. 

आज महाराष्ट्रात कोणताच कारखाना प्रोजेक्ट  योजना सुरु होवुच नयेत हे कटाक्षाने पाळले जाते आहे.  उद्धव ठाकरें आल्याने अनाजी दत्तो सारख्या देशद्रोह्यांची पंचायत झाली आहे.  सोन्याची कोंबडी उद्धव ठाकरेंच्या हातात अन् दिल्ली अरविंदाच्या ताब्यात यामुळे या लुटारुंची भयंकर अडचण झाली आहे.  दिल्ली सोडून गल्लीत बोंब़लत फिरायची वेळ आल्याने फडफड चालु आहे. दिल्ली जर ताब्यात असती तर तीचं नांव मोदीनगर केव्हाच झालं असतं, पण नियतीला मंजुर नाही. दिल्लीवर हजारो आक्रमणे झाली पण एकाने दिल्लीच्या नावाला धक्का दिला नाही.  मराठी माणसांनो गद्दारांचा सुळसुळाट घराघरांत वाढला आहे. त्यांना धडा शिकवण्याची अत्यंत गरज आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA