सर्व असंघटित मजुरांना आर्थिक मदत देण्याची श्रमिक जनता संघाची मागणी

 घरेलू कामगारांची नोंदणी साठी घरमालकांनी पुढाकार घ्यावा !
समता विचार प्रसारक संस्थेचे आवाहन !

  ठाणे - मार्च २०२० पासून आपण सारेच जण कोरोना महामारी बरोबर लढत आहोत.असंघटित व असुरक्षित श्रमिकांना मात्र "रोज कमाना रोज खाना" हा एकमेव मार्ग ही कोरोना / Lockdown मुळे बंद झाला आहे. घरकाम करणार्या बहुसंख्य कामगारांचे रोजगार बंद झाल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. महाराष्ट्र घरेलू कामगार कायद्यांतर्गत महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळ मार्फत सरकारने घरेलू कामगार आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण महामंडळ मार्फत बांधकाम मजुरांची नोंदणी सुरू केली होती. परंतु बहुसंख्य घरेलू कामगार व बांधकाम मजूर नोंदणी पासून अजूनही वंचित राहिले आहेत. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदतीपासून नोंदणी न झालेले असंघटित श्रमिकांना वंचित राहावे लागते आहे. श्रमिक जनता संघाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे  सर्व असंघटित मजुरांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यासाठी मजुरांची माहिती जमा करून सरकार कडे सादर करण्यासाठी महाराष्ट्र भर एन.ए.पी.एम. चे कार्यकर्ते नोंदणी करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी विविध संस्था संगठनांचे कार्यकर्ते सोसायटी पदाधिकारी आणि घर मालकांनी आपल्या घरात / सोसायटीत / वस्ती मध्ये माहिती  असलेल्या किंवा आपण संपर्क साधून माहिती मिळवणे शक्य असलेल्या घरेलू कामगार (धुणीभांडी, स्वयंपाक, मुलांना किंवा आजारी व्यक्तीची देखभाल करणारे इ.) आणि अन्य असंघटित मजुरांची माहिती मिळवून देवून एक नेक कामात आम्हाला मदत करून सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने सामाजिक सुरक्षा कारदा २००८ नुसार घरकामगारांबरोबरच सर्वच असंघटित मजुरांची नोंदणी सुरु करण्याची मागणी ही करण्यात आली आहे. 

 घरेलू कामगार नोंदणी साठी चे फार्म भरणे शक्य नसल्यास  घर कामगाराचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, कामाचे ठिकाण, मालकाचा फोन नंबर , कामाचे स्वरूप आदी माहिती लिहून संस्थेच्या सचिव हर्षलता कदम - 9967657128 आणि सुशांत जगताप - 8356996611 या नंबर वर पाठवल्यास त्यांची नोंदणी करण्यासाठी समता विचार प्रसारक संस्था व श्रमिक जनता संघ या घरेलू कामगारांच्या नोंदणी साठी प्रयत्न करणार असल्याचे समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा मनिषा जोशी आणि श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस संस्थेचे विश्वस्त जगदीश खैरालिया यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA