कुठून हे नग मिळतात ? - जितेंद्र आव्हाड


 मुंबई –  तसे पाहायला गेलो, तर कोरोना विषाणू सुद्धा एक जीव आहे. त्यालाही बाकी जीवांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. पण आपण स्वत:ला बुद्धीमान समजतो. आपण त्या विषाणूला संपवण्यासाठी तयार आहोत. पण त्यामुळेच तो जगण्यासाठी स्वत:मध्ये सतत बदल घडवत असल्याचे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांनी म्हटले आहे.  एकीकडे कोरोनाने देशात थैमान घातलेले असताना दुसरीकडे यावरुन भाजपच्या काही राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यं केली जात आहेत.  त्यामध्ये आता त्रिवेंद्र सिंह रावत यांची देखील भर पडली आहे.  त्यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत. काय तारे तोडतायत ऐका. कुठून हे नग मिळतात?, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी ट्विटरवर त्रिवेंद्र रावत यांचा व्हिडीओही शेअर केला आहे.  


दरम्यान भाईंदर पूर्वेच्या बंदरवाडी पालिका आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रात भाजपाचे नगरसेवक रोहिदास पाटील यांनी त्यांच्यासह अन्य काहीजणांचे लसीकरण थेट पदाचा गैरवापर करत दबावाखाली तेथील डॉक्टरांच्या दालनात करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लसींचा पुरवठा न झाल्याने सोमवार पासून पालिकेची बहुतांश लसीकरण केंद्र बंद होती. बुधवारी लस मिळाल्याने गुरुवारी ४५ वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण केंद्र पुन्हा सुरु झाली. तीन दिवस लसीकरण बंद असल्याने गुरुवारी बंदरवाडी लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी झाली. सकाळी ६ वाजल्यापासून लोकांनी रांग लावली होती. कडक उन्हात लोक तासन तास लस मिळावी म्हणून हाल सहन करत उभे होते. 

एकीकडे सामान्य नागरिकांचे हाल चालले असताना दुसरीकडे आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागचे डॉ. संदीप प्रधान यांच्या दालनात मात्र भाजपचे नगरसेवक रोहिदास पाटील हे पत्नी व अन्य निकटवर्तीय तसेच भाजपाचे माजी मंडळ अध्यक्ष श्रीपत मोरे आदींसह लसीकरण करून घेत होते. तर बाहेर तपासणीसाठी बाह्रुग्ण रांग लावून होते.  याबाबत डॉ. अंजली पाटील यांच्याकडे ह्या गंभीर प्रकाराबाबत थेट विचारणा केल्यावर नगरसेवक तेथून निघून गेले. तर उपस्थित डॉक्टर आदींची चलबिचल सुरु झाली. डॉक्टरांच्या टेबलावर कोविशील्डच्या लसीची बाटली आदी ठेवलेले होते. डॉ. पाटील यांनी डॉ. प्रधान यांना येथे लसीकरण कसे सुरु केले ? असा जाबसुद्धा विचारला. एकीकडे सामान्य नागरिक लसीकरणासाठी वणवण करून तासन तास हाल सहन करत असताना भाजपा नगरसेवक मात्र आपल्या गोतावळ्याचं डॉक्टरांच्या दालनात खास बडदास्त राखत लसीकरण करून घेत आहे. 

आपल्या वक्तव्यांनी नवनवे वाद सुरू करून देण्याची भाजपच्या नेत्यांची परंपरा अखंड सुरू आहे. वेळकाळाचं भान न राखता सार्वजनिकपणे वक्तव्य करून वाद निर्माण करणारे अनेक नेते भाजपमध्ये आहेत त्यापैकी एक मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर. त्यांनी आता ‘गोमूत्र अर्क प्यायल्याने फुफ्फुसांतील संसर्ग दूर होतो. मी दररोज गोमूत्र अर्क पिते त्यामुळे मला कोरोना झालेला नाही. म्हणून प्रत्येकाने देशी गाय पाळली पाहिजे आणि गोमूत्र प्यायला पाहिजे,’ असं मत व्यक्त केलं आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad