अन्नधान्याचे वाटप करून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन साजरा

 शहापूर 

 भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित  दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी सकाळी १० वाजता पुंडास येथील बुद्धविहारात शासनाचे सर्व नियम पाळत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न अशोक आंबेडकर यांचे हस्ते ६० कुटुंबियांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.

 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेस ४ मे २०२१ रोजी ६६ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी वर्धापनदिन साजरा करण्यासाठी पाच ते सहा लाख रुपये खर्च येतो मात्र कोरोनाकाळात मागील एक वर्षपासून अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, अनेक रोजगार बंद झालेत या स्थितीत वर्धापणाचा येणाऱ्या खर्चातून दहा हजार किलो अन्नधान्य आणि आत्यावश्यक वस्तू खरेदी करून गरजू लोकांपर्यंत पोहचवू या उदात्त हेतूने मंगळवारी पुंडास येथील बुद्ध विहारात ६० गरजू कुटुंबियांना एक महिना पुरेल एवढे  अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. 

या प्रसंगी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे  राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न अशोक आंबेडकर, महाराष्ट्र प्रदेश संस्कार प्रमुख रविकांत जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष बुधाजी वाढविंदे, जिल्हा महासचिव रविंद गुरचर,  जिल्हा कोषाध्यक्ष हनुमंते धिरे, जिल्हा संघटक मारुती कांबळे, बेहरे सर, पत्रकार संजय भालेराव, किरणकुमार थोरात आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक पुंडास येथील  कार्यकारिणीचे भीमराव जाधव, भरत जाधव, अविनाश जाधव, स्वप्नील जाधव, सुरेश गायकवाड, ज्योती जाधव, प्रतिमा जाधव, माधुरी जाधव, प्रमोद गायकवाड, प्रतीक जाधव, अजय जाधव, विनोद जाधव आणि अमीर जाधव आदींनी विशेष मेहनत घेतली.

 कोरोना संसर्गात मोठ्या प्रमाणात बेड्सचा, ऑक्सिजन बेड्सचा तुटवडा आहे, टंचाई आहे त्यामुळे महाराष्ट्रामधील जेवढे बुद्ध विहार आहेत. ते सर्व विहार आयसोलेशनसाठी लोकांनी उपलब्ध करून द्यावेत. -
-  राजरत्न  आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष , दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया)टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या