ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकाचे मद्य वाटप

 


ठाणे : एकीकडे कोरोना सारखी भयंकर परिस्थिती उद्भवली असल्याने अनेक सामाजिक संघटना, विविध राजकिय पक्षातील कार्यकर्त्यांनी गरजुंना मदतीचा हात दिला आहे. असे असताना ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या एका नगरसेवकाने चक्क मद्य वाटप केल्याने सर्वत्र आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील वागळे परिसरातील या नगरसेवकाने शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांच्या कार्यालयात हा दारू वाटपाचा कार्यक्रम केला. याच परिसरात राहणारे समाजसेवक प्रकाश सुर्वे यांनी याबाबत थेट ठाणे मनपा आयुक्त, ठाणे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली असून या नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 कोविडमुळे उध्दवलेल्या भीषण परिस्थितीचा सामना सर्वजण करत आहेत.केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे करीत आहेत.मात्र त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकाने प्रशासनाच्या कामावर पाणी फिरवण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.आ.फाटक यांच्या खास मर्जीतील या नगरसेवकाने या आधीही अशी बरीच कर्मकांडे केल्याचे स्थानिक सांगतात.तेव्हा, अश्या असंवेदनशील नगरसेवकांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 अनेक लोकप्रतिनिधी हे स्वतः शहरातील इतर भागात जाऊन गरीब आणि गरजूंना धान्य वाटप,जेवण वाटप तसेच काही जण ऑक्सिजन व प्लाझा वाटप करत असताना शिवसेनेचे हे नगरसेवक महाशय चक्क मद्य वाटप करत आहेत.या मद्य वाटपाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पक्षाची बदनामी असे नगरसेवक करत असल्याने या नगरसेवकांवर पक्षाने कडक कारवाई करावी. अशी मागणी पोलीस आयुक्त व अन्य विभागांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA