केंद्र-राज्य शासनाच्या निर्देशांनुसार ठाण्यातील सुमारे ८५ खाजगी रूग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी

   

    केंद्र-राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार ठाणे महानगरपालिकेच्या टास्क फोर्सच्या माध्यमातून ठाण्यात आतापर्यंत ८५  नवीन खासगी हॉस्पिटलना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.  कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यापकता वाढविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे या उद्देशाने ठाणे महापालिकेच्यावतीने सर्व खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना  व गृह संकुले यांच्यासाठी लसीकरण धोरण निश्चित करण्यात आले आहे.  खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना  व गृह संकुले यांच्यासाठी निश्चित केलेल्या लसीकरण धोरणांतर्गत खाजगी रूग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. 

या धोरणातंर्गत वर्तकनगर येथील सिद्धीविनायक रूग्णालयाच्या माध्यमातून आदित्य बिर्ला ग्रुपच्या जवळपास २२०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. रोज ५०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण याप्रमाणे आतापर्यंत एकूण २२०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले आहे. या सर्व रूग्णालयांचे डॅाक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी यांना महापालिकेच्यावतीने प्रशिक्षणही देण्यात आले असून लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, त्याचे व्यवस्थापन कसे असायला हवे याची माहिती या प्रशिक्षणामध्ये देण्यात आली.

        या लसीकरण केंद्रावर लस योग्यरित्या संग्रह करण्याची जबाबदारी बिर्ला ग्रुपची असून सिद्धिविनायक हॉस्पिटलने १ वैद्यकीय अधिकारी, ३ व्हॅक्सिनेटर आणि ६ इतर मेडिकल स्टाफ अशी १० जणांची नेमणूक या ठिकाणी केली आहे. लसीकरणासाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोविन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक असून सर्व कर्मचाऱ्यांची रीतसर नोंदणी करण्यात आली आहे. सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून आता वागळे येथील आयआयएफएल या खासगी आस्थापनामध्ये देखील लसीकरण सुरू आहे.  दरम्यान ज्या आस्थापनांना लसीकरण केंद्र सुरू करावयाचे आहे त्यांनी खासगी लस पुरवठा धारकांकडून लस उपलब्ध करून लसीकरण केंद्र सुरु करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले असून महापालिकेकडून फक्त लसीकरण केंद्राच्या तांत्रिक बाबीसंदर्भात महापालिकेच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA