मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारवर ढकलून मोदी यांचा बचाव करण्याचा प्रयत्न

   मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारित असतानाही भाजपाकडून त्यावर राजकारण केले जात आहे. राज्य सरकारवर सर्व ढकलून राज्यातील भाजपा नेते नरेंद्र मोदी यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात भारतीय जनता पक्ष आणि आरएसएस यांची विचारधारा ही आरक्षणविरोधी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी जर भाजपाची प्रामाणिक इच्छा असत्ती तर पाच वर्ष महाराष्ट्रात तसेच केंद्रातही सत्ता असताना 'फुलप्रुफ' आरक्षण देता आले असते. पण सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण किती 'फुलप्रफ"होते हे दाखवून दिले आहे. असे मत  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केले,

मराठा आरक्षण प्रश्नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना चार वेळा भेटण्याची वेळ मागितली, परंतु आजपर्यंत मोदींनी त्यांना वेळच दिलीं नाही.  मराठा आरक्षणाकरिता भेट मागणाऱ्या छत्रपती संभाजीरार्जेना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही. संभाजीरार्जेना भेट न देणे हा महाराष्टाचा अवमान आहे. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला छत्रपतींची आठवण केवळ निवडणुकीच्या वेळीच येते का, असा सवाल सावंत यांनी केला. चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कंगना राणावत त इतर बॉलितूड अभिनेत्यांना मेट देतात. या सर्व तारकांचे कोणते गहन प्रश्न होते त्यांना मोदींनी वेळ दिला. मोर्दीनीं कोणाला भेटाते हा त्यांचा प्रश्न असल्याने आमचा आक्षेप नाही.  पण मराठा समाजाच्या समस्या घेऊन जाणाऱ्या आपल्याच पक्षाच्या नेत्यांना तेही छत्रपतींच्या वंशजाला भेट न देणे हे महाराष्ट्राला कदापि आवडणार नाही. 

महाराष्ट्रातील बॉलिवूडंबद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचें म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५६ मोर्चे काढून इतिहास रचणा-पा आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे तसेच मराठा आरक्षणासाठी शहिद झालेल्यांचा घोर अपमान करणारे आहे. चंद्रकांत पाटील हे मनकवडे आहेत असे दिसते. मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी मोदींना मराठा आरक्षण राज्याचा विषय वाटल्याने संभाजीराजे यांना मोदींनी भेट दिली नसल्याचे सांगिंतल्याची आठवणही त्यांनी यावेळीं करून दिली .त्यांच्या वक्‍तव्यातून त्यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. मोदींची विषयांची समज फारं कमी आहे. मोंदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाहीं आणि छत्रपतीं संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपतीं या उपाधीची केवळ मतांकरिता वापरण्या इतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे असा टोलाही सावंत यांनी लगावला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA