तथाकथित नेतेमंडळींच्या आप्तेष्ट मित्र परिवारासाठी लसीचा ५० टक्के कोटा राखीव ?

  एकीकडे सर्वसामान्य नागरीक रांगेत उभे राहुन लस घेत असताना काही नेतेमंडळी घुसखोरी करून टोकनशिवाय आपआपल्या परिचितांना लसींचा फायदा मिळवुन देण्यास पुढाकार घेत आहेत. एखाद्या केंद्रात १०० लसींचा साठा आला तर, पुढारी मंडळी त्यातील ५० लसी स्वतःसाठी राखुन ठेवण्यास केंद्र संचालकांना धमकावतात. त्यामुळे टोकन घेऊन रांगेत उभे राहिलेल्या नागरीकांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे.तेव्हा, प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन कारवाई करावी.  बहुतांश आरोग्य केंद्रावर काही बड्या पुढा-यांच्या हस्तकांकरवी यंत्रणेवर दबाव आणला जात असुन टोकन न घेताच केंद्रातील लसीच्या साठ्यावर परस्पर डल्ला मारला जात असल्याचा धक्कादायक आरोप आमदार संजय केळकर यानी केला आहे.  या पुढा-यांना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देशही केळकर यानी प्रशासनाला दिले आहेत. 

 ठाण्यात बेड, इंजेक्शननंतर आता हेवीवेट पुढा-यांकडुन लसीचा गोलमाल सुरू झाल्याने ठाणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण  निर्माण झाले आहे.  ठाणे महापालिकेच्या लसीकरण मोहीमेत सुरु असलेल्या अनागोंदीचे पडसाद काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले होते. काही सत्ताधारी मंडळी आपल्या हस्तकांकरवी ठाणे महापालिकेच्या केंद्रात लसींचा साठा आपआपल्या प्रभागातील नागरिकांना देण्यास केंद्र संचालकांना भाग पाडत असल्याचे आरोप याच बैठकीत झाले होते. त्यानंतर पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात देखील पुढाऱ्यांमार्फत आलेल्या वशिलेबाजांना व्हीआयपी कक्षात विनाटोकन लसीकरण सुरु असल्याची बाब भाजपने समोर आणली होती.  या पार्श्वभुमीवर केळकर यांनी, लसीकरणात गोलमाल सुरु असल्याचे म्हटले असुन काही हेवीवेट पुढाऱ्यांकडुन लसीकरणात सुरु असलेला हस्तक्षेप रोखण्याच्या सुचना प्रशासनाला केल्या आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या