भूमाफियांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिली Toyota Fortuner


ठाण्यामध्ये एकीकडे महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतच असतानाच दुसरीकडे या परिस्थितीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फायदा घेत प्रचंड अनधिकृत बांधकामे निर्माण होत आहेत. या बांधकामांवर कोणत्याही प्रकारचा अंकुष लागलेला नाही. प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक लागेबांधे करीत ही बांधकामे राजरोसपणे सुरु आहेत. अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यास गेलेल्या नागरिकांना अधिकारी सांगतात कोरोनाच्या ड्यूटीवर आहे. नंतर  बघू.... तोपर्यंत बांधकामे पूर्ण झालेली असतात. 
ठाण्यातील कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत व्यावसायिक भूमाफियांनी कारवाई करु नये म्हणून येथील अधिकाऱयांना चक्क गाड्याच दिल्या आहेत. दोन वाहने एक Toyota Fortuner आणि दुचाकी  भेट म्हणून देण्यात आल्या आहेत. याबाबत वृत्त पसरताच ठाण्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे. हा अधिकारी कोण ज्याला भूमाफियांनी या महागड्या गाड्या भेट म्हणून दिल्या आहेत. असा प्रश्न कळवा परिसरातील प्रत्येक नागरिकाला पडला आहे.  
प्रभाग समितीमधील या अधिकाऱयांने आपल्याला मिळालेल्या या महागड्या भेटीच्या बदल्यात मनिषा विद्यालय / तरण तलावाजवळ  अनाधिकृत बांधकामास परवानगी दिली आहे. येथे  जानकी हाईट नावाची तळ अधिक आठ मजली इमारत उभी रहात आहेत. विकासकाने ठाणे महानगर पालिका शहर विकास विभागाकडून कोणत्याही स्वरुपाची विकासास परवानगी घेतलेली नसल्याची माहिती मिळत आहे.

सदर बांधकाम अतिशय जलदगतीने झाले असल्याने याच्याबाबत परिसरातील नागरिक शंका व्यक्त करीत आहेत. भविष्यात मोठी दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल कळव्यातील नागरिक करीत आहेत.  याबद्दल तात्काळ संबंधित अधिकाऱयांची चौकशी करावी तसेच सदर अनधिकृत बांधकामाची देखील चौकशी करून या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ बिपीन शर्मा यांनी द्यावेत अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.
ठाणे महानगर पालिका कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत पालिका अधिकाऱयांच्या संगनमताने जोरदार अनधिकृत कळवानगर वसवण्याचे काम सुरू आहे. कोणतीही जागा, भूखंड शिल्लक रहाता कामा नये असे आदेशच चक्क इथल्या प्रभाग समितीच्या अधिकाऱयांनी भूमाफियांना दिले असल्याची चर्चा संपूर्ण कळवा परिसरात रंगली आहे. या मोबदल्यात अधिकाऱयांना मागेल ते देण्यात येत असल्याचेही बोलले जात आहे. कळवा प्रभाग समितीच्या अधिकाऱयाला देण्यात आलेल्या या भेटीचे पोस्टरच सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या