‘सरस्वती’सह त्यांचे सारे थोतांड : मा. म. देशमुख


 हडप्पा संस्कृतीवर ‘सरस्वती’ आणि ‘वैदिक’ संस्कृतीचे अनैतिक अतिक्रमण;
हे तर संस्कृतीचे अवमूल्यन -रोमिला थापर

भारतातील प्राचीन सभ्यता, समानता, नैतिक, मानवतावादी आणि स्त्रीसत्ताक हडप्पा (सिंधु) संस्कृतीचे ‘सरस्वती संस्कृती’ असे नामकरण करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने पदवी शिक्षणासाठी नव्याने तयार केलेल्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात हिंदू पुराणे व धार्मिक साहित्याला स्थान देण्यात आले आहे. आरएसएसचे भाजप सरकार सत्तेत आल्यापासून इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे प्रयत्न वारंवार सुरू आहेत. हिंदुत्ववादाच्या नावाखाली ‘बामणी’ मते पाठ्यपुस्तकांत घुसडली जाताहेत. मोठ्या प्रमाणात इतिहासाचे विद्रुपीकरण संस्थात्मक पातळीवर सुरू असल्याने ते चिंताजनक आहे. हडप्पा संस्कृतीचे सरस्वती संस्कृती अथवा वैदिक संस्कृती असे नामकरण म्हणजे सभ्यतेवर असभ्यतेचे, समतेवर विषमतेचे, नैतिकतेवर अनैतिकतेचे, मानवतेवर अमानवतेचे, स्त्रीसत्ताक गणराज्यावर पुरूषसत्ताक राज्याचे अतिक्रमण मानले जात आहे.

काय आहे प्रकरण? :
विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवी शिक्षणासाठी इतिहासाचा अभ्यासक्रम नव्याने तयार केला आहे. त्यात हिंदू पुराणे व धार्मिक साहित्याला स्थान दिले आहे. अभ्यासक्रमाबाबतच्या दस्तावेजात म्हटले आहे की, अभ्यासक्रम केवळ मार्गदर्शक तत्त्व म्हणून रचण्यात आला आहे. भारतीय इतिहासाच्या वैभवशाली भूतकाळाला तसेच विस्तृत पटाला न्याय देण्याचे काम केवळ सुक्ष्म व ढोबळ स्तरावर स्वातंत्र्य देऊनच करता येईल, अशी सारवासारही करण्यात आली आहे. तथापि, वास्तव काही वेगळे आहे. इतिहासाच्या अभ्यासक्रमातील पहिल्या पेपरसाठी ‘आयडिया ऑफ भारत’ हा विषय असून यामध्ये प्रागैतिहासिक व ऐतिहासिक कालखंडाचा समावेश आहे. ‘कन्सेप्ट ऑफ भारतवंश’, ‘इटर्निटी ऑफ सिनॉनिमस भारत’ आणि ‘द ग्लोरी ऑफ इंडियन लिटरेचर : वेद, वेदगंगा, उपनिषद्स, एपिक्स, जैन अँड बुद्धिस्ट लिटरेचर, स्मृती, पुराणाज’ असे विषय यात आहेत. नवीन अभ्यासक्रमात धार्मिक साहित्याचे उदात्तीकरण धर्मनिरपेक्ष भारतासाठी घातक आहे.

सरस्वतीच्या अस्तित्वाबाबत इतिहासकारांना शंका :
आणखी एका पेपरचा विषय सिंधु-सरस्वती संस्कृती असा आहे. यामध्ये सिंधु व सरस्वती संस्कृती व वैदिक संस्कृती यांच्यातील परस्परसंबंधांचा समावेश आहे. ऋग्वेदातील सरस्वती नदीचा उल्लेख हा गेल्या शतकभरापासून शास्ज्ञज्ञांसाठी ‘कुतूहला’चा विषय आहे. ‘पौराणिक’ सरस्वती नदीच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्राने प्रकल्प सुरू केले आहेत. मात्र, पुराणांमध्ये उल्लेख असलेली सरस्वती हीच का, याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेेत. एकूणच हडप्पा संस्कृतीऐवजी आता सरस्वती संस्कृती आणि वैदिक संस्कृती विद्यार्थ्यांना शिकविली जाणार आहे. वैदिक संस्कृती दुसरी तिसरी काही नसून ब्राह्मणी संस्कृती होय. वैदिक संस्कृती म्हणजे विषमता, अवैज्ञानिक, असभ्यता, अनैतिकता, अमानवियता आणि अनैसर्गिकता या अवगुणाचा मिलाफ. या संस्कृतीतून ओढवलेल्या गुलामीचा भारतीयांना चांगलाच वाईट अनुभव आहे. त्यामुळे ही संस्कृती पुन्हा स्वीकारावी काय, हे सर्वस्वी भारतीयांवर अवलंबून आहे.

इतिहासकारांत तीव्र नाराजी आणि संताप :
या पार्श्‍वभूमीवर बहुजन शासकने देशातील काही मान्यवर इतिहासकारांची मते जाणून घेतली. हडप्पा संस्कृतीचे सरस्वती संस्कृती असे नामकरण आणि त्या जोडीने वैदिक संस्कृती शिकवणे म्हणजे देशातील विद्वान, विज्ञानवाद्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. हडप्पा संस्कृतीवर सरस्वती संस्कृतीचे अनैतिक अतिक्रमण स्वीकारले जाणार नसल्याचे ठाम मत प्राचीन भारतीय इतिहासाच्या संशोधक रोमिला थापर यांनी मांडले आहे. हा विचारच एका व्यापक संस्कृतिला संकुचित करणारा आहे. मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचे संशोधक आणि भाष्यकार मा. म. देशमुख यांनी तर सरस्वती हीच थोतांड असल्याचे म्हटले आहे. इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी हा राष्ट्रीय स्वंय सेवक संघाचा अजेंडा भारतीयांवर थोपविला जात असल्याचा आरोप केला आहे. माजी सनदी अधिकारी अनंतराव सरवदे यांनी हा प्रकार म्हणजे ‘सांस्कृतिक प्रतिक्रांती’ असल्याचे सांगून विज्ञानवादी आणि संविधानवाद्यांसमोर हे मोठे आव्हान असल्याचे म्हटलेय.

‘सिंधु संस्कृती’ हेच संबोधन उचित :
प्राचीन भारतीय इतिहासाच्या संशोधक रोमिला थापर यांनी भौगोलिक आणि ऐतिहासिक कारणे देताना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या कृतीचा विरोध दर्शविला. त्यासाठी त्यांनी पुरातत्व विभागाचा आधार घेतला. त्या म्हणतात, पुरातत्वशास्त्रात एखाद्या संस्कृती स्थळाचा सर्वप्रथम शोध लागून त्यावर कार्य केले असता त्यावरुन त्याला नाव देण्याची परंपरा आहे. त्यामुळे सद्य वापरात असलेली अचूक परिभाषा म्हणजे हडप्पा किंवा हरप्पा संस्कृती होय. सभ्यतेचा उपयोग सहसा त्या संस्कृतीने व्यापलेल्या फार मोठ्या क्षेत्रासाठी केला जातो. मध्य आशियाच्या काठावरील पमीर पर्वतरांगांमध्ये बदकशानपासून सिंधू पठारानंतर दक्षिणेकडे गुजरात आणि पश्चिमेकडील बलुचिस्तानपासून पूर्वेकडील दोआबपर्यंत हडप्पा संस्कृतीचा भौगोलिक प्रसार झालेला आहे. त्याला ‘सिंधू संस्कृती’ असे संबोधणे अधिक उचित ठरते.

पुढे त्या म्हणतात, हडप्पा संस्कृतीचे सरस्वती आणि वैदिक संस्कृती असे नामकरण केल्याने दोन कारणांमुळे समस्या निर्माण होतात. हडप्पाला सरस्वती नदीवरून संस्कृती म्हटल्यावर सर्व उत्तर आणि उत्तर-पश्‍चिमचा भाग पमीर ते बलुचिस्तान आणि वरील सिंधु पठाराचा त्याग करावा लागेल, त्यामुळे तो खूपच छोटा भाग शिल्‍लक राहील. आणि जेव्हा वैदिक संस्कृती असा उल्‍लेख केल्यावर हडप्पा संस्कृती आणि वैदिक स्त्रोतांमध्ये वर्णिलेल्या संस्कृतीत फरक करणारे आणि या दोघांना एकसारखे मानत नाहीत, अशा मोठ्या प्रमाणात विद्वानांमध्ये मतभिन्नता पाहावयास मिळेल. या ऐतिहासिक आणि भौगोलिक संदर्भासह हडप्पा वा सिंधु संस्कृतीचे अवमूल्यन वा तिला संकुचित करणे भारताच्या हिताचे नसल्याचाच अप्रत्यक्ष इशारा  रोमिला थापर (प्राचीन भारतीय इतिहासाच्या संशोधक, नवी दिल्‍ली एप्रिल ०१, २०२१ ) यांनी दिला आहे.

‘सरस्वती’सह त्यांचे सारे थोतांड : मा. म. देशमुख
हडप्पाचे नामकरण सरस्वती संस्कृती केले आहे, यात नवीन काही नाही. असे खूप बदल इतिहासाच्या पाना-पानांवर करण्यात आले आहेत. वेद काल्पनिक आहेत. वेद काही संस्कृतमध्ये नव्हते. हा सुद्ध अडाणीपणा आहे. वेद, महाभारत, पुराणं, स्मृती हे सारे काल्पनिक असून थोतांड आहेत. या सर्वांची निर्मिती अगदी 200-300 वर्षातली आहे. हे ग्रंथ प्राचीनही नाहीत. हडप्पा तर दूरची बात. संस्कृतमध्ये वेद, रामायण, महाभारत, स्मृती, पुराणे नव्हती. त्यावेळी संस्कृतच नव्हती. संस्कृतची निर्मितीच प्राकृत-पाली-मराठी भाषेतून झालेली आहे. संस्कृत ही ‘चोरभाषा’ आहे. यांच्या खोटं बोलण्याविषयी काय सांगावं. प्रधानमंत्री मोदी म्हणाले, ‘मी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्यागृह केला’. असा हा खोटारडेपणा तेवढाच मूर्खपणा! कारण त्यांचे गुरूच मूर्ख आहेत. त्यांच्याकडे स्वत:चे असे काहीच नाही. झिरो आहेत. त्यांच्याकडे शास्त्रज्ञ-विद्वानही नाहीत. परंतू आता आपल्या लक्षात येत आहे की, त्यांनी आपले बरेचसे ऐतिहासिक संदर्भ नष्ट केले आहेत, बदलले आहेत. सरस्वती कोण आहे? हे त्यांनीच सांगून ठेवलेले आहे. सरस्वतीचा बाप, माय, नवरा कोण? या तिन्हीही भूमिकेत ब्रह्मदेव आहे. आणि हे आपले साहित्यिक संमेलनात ‘माझी माय सरस्वती’ म्हणतात. म्हणजे तुम्ही व्याभिचारातून झालेले आहात काय? असा खडा सवाल मध्ययुगीन भारताचा इतिहासाचे संशोधक तथा भाष्यकार मा. म. देशमुख यांनी उपस्थित केला आहे. 

ते म्हणतात, असे मूर्ख साहित्यिक आहेत. त्यांच्यातले काही स्वत:ला एक्सपर्ट समजतात, हा सारा मूर्खांचा बाजार आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर सचिन तेंडुलकर शतक काढण्यासाठी मंदगतीने खेळला. त्याने खूप चेंडू खाल्‍ले आणि शतक केले. परिणामी कमी चेंडू शिल्‍लक राहिल्याने इतर खेळाडुंना फटकेबाजी करावी लागली. त्यात ते आऊट झाले. बांगलादेशकडून भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. याची लाज वाटत नाही. परंतू सचिनला भारतरत्न दिला. जे त्याच्यापेक्षा हजारपटीने लायकीचे आहेत, त्यांना देत नाहीत. शिफारसतट्टू जे की बोगस आहेत, तेच मोठे होतात, अशातला हा प्रकार आहे. आताची नवीन पिढी चिकित्सा करायला लागली. ही पिढी गेल्यावर 50 वर्षांनी या देशातील चातुर्वर्ण्याचे पुतळे आहेत, ते सगळे फेकून देतील. म्हणजे बाबासाहेब मंत्रिमंडळात नेहरूंच्या मागे उभे होते. पण आज बाबासाहेबांची जयंती जगभर साजरी होते. आणि नेहरूला कुणी विचारत नाही! काळ यावा लागतो. आपल्या क्षमतेने विरोधाचा आवाज बुलंद करावा. कारण ते आपल्या विरोधात आहेत, त्याबरोबरच आपलेही आपल्या विरोधात असतात. अशा विरोधातून जावे लागत आहे. अभ्यासक्रमाचे काय घेऊन बसलात. सगळा अभ्यासक्रमच त्यांचा आहे. फुले-शाहू-आंबेडकर कुठे शिकवले जातात. कुणी आग्रह नाही करत. आपलीही लोकं तिथे आहेत, पण ते त्यांच्या कलेने वागतात. समिती, पुरस्कार, मंत्रिपद मिळाले की झाले. आपले विद्वान असे विकले गेले आहेत, मग ते सगळ्या जातीतले, या शब्दात मा. म. देशमुख (तत्वज्ञ, इतिहास संशोधक) यांनी आपला संताप व्यक्‍त केला.

. ज्ञानपरंपरेला सगळ्यात मोठा हादरा :
भारतातील प्राचीन संस्कृती हडप्पाचे नामकरण सरस्वती संस्कृती करणे हा ज्ञानपरंपरेला सगळ्यात मोठा हादरा आहे. जी सरस्वती नदी भारतातील आहे की, नाही हे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्या नदीच्या नावाचा आग्रह कशासाठी? हा सगळा प्रकार संघाचा वैदिक अजेंडा राबविण्यासाठी आटापिटा सुरू आहे. आता ज्ञानाचे स्त्रोत बदलले आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम एवढाच ज्ञानाचा 

इतिहासतज्ज्ञ आणि विज्ञानवाद्यांपुढे मोठे आव्हान :
एक अत्यंत गुलामीकडे आणि धार्मिक अंधश्रद्धेकडे घेऊन जाणारा निर्णय केंद्रीय मानव संसाधन मंत्रालया अंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाने आखला आहे. अनपढ, अशिक्षित, कोणत्याही शाळेत, महाविद्यालयात, गुरुकुलात, विद्यापीठात न शिकलेली सरस्वती संस्कृतीचा आदर्श पदवीच्या विद्यार्थ्यांपुढे ठेवला जाणार आहे. एव्हढेच नाही तर सरस्वती संस्कृती सोबत वैदिक संस्कृती ही शिकवली जाणार असून युजीसीने हा (New Syllabus Old Cultural plan) प्रस्तावित केला आहे, हे अत्यंत घातक आहे. संघ परिवाराने अत्यंत धूर्तपणे वैदिक व मनुस्मृती संस्कृती आमच्या मेंदूवर बिंबविण्याचा हा त्यांचा छुपा अजेंडा सर्व भारतीयांवर थोपवला आहे.  

सरस्वती आणि वैदिक संस्कृतीचे दुष्परिणाम:   
(1)  या संस्कृती बदलाच्या अभ्यासक्रमाने 1260 वर्षांची प्राचीन बौद्ध सम्राट संस्कृती आणि मानवतावादी विचारांस हरताळ फासला जाणार आहे   (2) सरस्वती संस्कृतीने एका अनैतिक (पहा:- वि.का.राजवाडे यांचा भारतीय विवाह संस्थेचा इतिहास), अनपढ व धार्मिक पर्वास प्रारंभ होईल. त्यामुळे शिक्षणातील विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनांस पायबंद बसेल!  (3) वैदिक संस्कृती अभ्यासक्रमामुळे येथील विदेशी आर्यसंस्कृतीच्या पुनर्जीवनास चालना मिळेल. (4) या दोन्हीही संस्कृतीमुळे ऐतिहासिक सत्याची मोडतोड होण्याची दाट शक्यता असून अनैतिहासिक, अवास्तव पुढे आणून धार्मिक पुनर्जीवनास सुरुवात होऊन त्याला चालना मिळेल. आंतरराष्ट्रीयस्तरावर भारतीय विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थाचे अवमूल्यन होईल व विदेशी विद्यार्थी येथील युनिव्हर्सिटीजमध्ये प्रवेश घेण्यास धजावणार नाहीत.

(5) अनेक धर्म व 6500 हून अधिक जाती असणार्‍या देशात धार्मिक असहिष्णुता वृद्धिंगत होईल. मनुस्मृतीचे पुनरुज्जीवन होऊन संघविचारधारे प्रमाणे देशाची वाटचाल हिंदूराष्ट्राच्या दिशेने होईल. परिणामी लोकशाही व संविधानिक मूल्य मुद्दामहून पायदळी तुडवली जातील. (6)  सदरच्या संस्कृती संवर्धनामुळे मानवीमूल्य (Human Values Rights) व समानतेच्या तत्वाला तिलांजली मिळून मानवी मेंदूवर गुलामी स्वीकारणारे(Slavery Acceptance) विचारांचा भडीमार केला जाईल. (7) ज्या नागरी परंपरा काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत त्या कालबाह्य परंपरांच्या उदात्तीकरणाच्या सोबत विदेशी आर्यश्रेष्ठत्वाची रुजवणूक करणे म्हणजे 3.5 टक्के लोकांचा बहुसंख्याकावर राज्य करण्याचा (Divine Rights) दैविक, मनुस्मृती दिग्दर्शित धार्मिक अधिकार मान्य करण्यास स्वीकृती देणे होय.

या निमित्ताने या देशातील विज्ञानवादी, संविधानवादी, लोकशाहीवादी व समतावाद्यांसमोर फार मोठे (Challange) आव्हान उभे राहिलेले आहे. येऊ घातलेल्या सरस्वती व वैदिक संस्कृतीमुळे देशांत कमालीचा धार्मिक कट्टरतावाद, पुरोहितवाद व अंधश्रद्धेचे अधिराज्य येऊ घातले असेल तर ही ब्राह्मणी पुनर्सांस्कृतिक प्रतिक्रांतीला (Cultural Counter Revelution) सर्व शक्तीनिशी वेळीच थोपवणे क्रमप्राप्त आहे. या काल्पनिक व अनैतिक (Immoral) संस्कृतीचा समावेश इतिहासाच्या पदवी अभ्यासक्रमांत केल्यास एससी, एसटी, ओबीसी व बहुजन समाजातील एकही शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, प्रोफेसर्स त्यांची सेवा बजावू शकणार नाहीत, असा धोका निर्माण होतो.

⮚ अनंतराव सरवदे
(से. नि. तहसीलदार, बीड)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या