चैत्यभूमी जवळील धर्मशाळेवरील बेकायदेशीर बांधकाम तात्काळ निष्काशित करण्यासाठी नितिन मोरे यांचे उपोषण आंदोलन


आंबेडकरी जनतेच्या चळवळीचे केंद्र बिंदू असलेले सिद्धार्थ हॉस्टेल जमिनदोस्त करण्यात आले मात्र इतकी वर्षे होऊनही अद्याप ते उभे रहात नाही. तोच डॉ.आंबेडकर भवनवर जातीयवादी मानसिकतेने हल्ला चढवला आणि आता चैत्यभूमीचे महत्व कमी करण्याकरिता जवळच असलेल्या धर्मशाळेवर बेकायदेशीरपणे मजला वाढवण्याचे काम जातीयवादी आमदार सदा सरवणकर यांच्या माध्यमातून होत आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आंबेडकरी जनतेमध्ये उमटले आहेत. याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास आम्ही ते जमिनदोस्त करू असा पवित्रा आंबेडकरी जनतेने घेतला असल्याचे दिसत आहे. तरी याबाबत तात्काळ कारवाई करावी   मात्र महापालिका प्रशासन याबाबत चालढकल करीत असल्याच्या निषेधार्थ जयभीम आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे यांनी १३ एप्रिल पासून आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत सुखदेव पवार, संजय कांबळे, विश्वास जाधव,  कुणाल तुरेराव, गौतम कांबळे, स्नेहा पवार, अर्जुन कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी होत आहे. अशी माहिती अनिल शिंदेकर, सुनिल चव्हाण, दिनेश वाढवे आणि एस रविराज यांनी दिली आहे. 

चैत्यभूमीच्या प्रवेशद्वाराशेजारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर स्मशानभूमीतील धर्मशाळाचे छप्पर बसवण्याच्या नावाखाली बेकायदेशीर बांधकाम भागोजी कीर स्मशानभूमीत जांभेकर महाराज पथ, शिवाजी पार्क, दादर येथे केले आहे. नागरिकांच्या सोयीसुविधा करता बांधण्यात आलेल्या विधी करावयाच्या हॉलची पुनर्बाधणी स्थानिक आमदार शिवसेना नेते सदा सरवणकर यांनी पाठपुरावा करून पूर्ण केले आहे असे त्यांनी सहाय्यक आयुक्तांना लिहलेल्या पत्राच्या माध्यमातून त्यांच्याकडे बांधकामाबाबत सतत पाठपुरावा केलेला दिसतो. सी.आर.झेड चे नियम असे आहेत की वरचा मजला बांधकाम करता येत नाहीत ते नियम डावलून स्मशानभूमीतील धर्मशाळा याचे छप्पर बसवण्याच्या नावाखाली बांधकाम केले आहे यासाठी जिल्हा नियोजन व विकास कार्यक्रमांतर्गत स्मशानभुमी सुधारणा करण्याकरता निधी उपलब्ध सुध्दा झाला. सी.आर.झेड.चे नियम असताना त्याच्यामध्ये पहिला वरचा मजला त्याला छप्पर असे उल्लेख केला आहेव ते बसवले आहे आणि त्याच्यावरती बांधकाम करणे नियमात बसत नसतानासुद्धा हॉलचे नूतनीकरण करण्याच्या नावाखाली जाणीवपूर्वक हे बांधलेले आहे. यामुळे ऐतिहासिक चैत्यभूमी मध्ये जाण्यासाठीचे प्रवेशद्वार आहे ते काही प्रमाणात झाकले जात आहे. या बेकायदेशीर बांधकामामुळे निश्चितपणाने जातीवादी आमदाराच्या माध्यमातून काहीतरी समाजामध्ये संभ्रम निर्माण करून संघर्ष पेटेल किंवा पेटवण्याचा दृष्टीने हे कारणीभूत ठरेल हे नाकारता येत नाही. याबाबत आमदारांनी "ना हरकत पत्र" मिळवण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. सदर बांधकाम हे अनधिकृत असताना सुद्धा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ यांनी कंत्राटदारामार्फत हे बांधकाम केले आहे. 

तसेच बांधकामासाठी उपलब्ध झालेला निधी एवढा मोठा आहे की त्यामुळे तिथल्या असणाऱ्या कंत्राटदार, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या संघनमताने हे काम केलेले दिसून येते. हॉल साठी दुरुस्तीच्या नावाखाली जी प्लस वन ( 641) हे बांधकाम केलेले आहे त्यामुळे सदर कॉन्ट्रॅक्टरवर व संबंधित अधिकाऱ्यांवर महानगरपालिकेने परवानगी दिल्यामुळे आणि जिल्हाधिकारी यांनी निधी दिल्यामुळे शासन कशी कारवाई करते ते पाहणे आवश्यक आहे. झोपडपट्ट्यांमध्ये थोडंसं काही बांधकाम किंवा कुठल्या ठिकाणी थोडंसंच बांधकाम झालं तर तात्काळ निष्कासणाची कारवार्ड करणाऱ्या महानगरपालिकेने सदर चैत्यभूमी प्रवेशद्वार झाकत असताना जाणीवपूर्वक डोळेझाकपणा केलेला दिसतो. यामधून महापालिकेतील अधिकाऱ्यांची जातीयवादी मानसिकता दिसून येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1