Trending

6/recent/ticker-posts

... तर परिस्थिती आणखी गंभीर होईल


 मुंबई  : 

कोरोबाचा प्रादुभाव सुरु झाल्यापासून खा. राहुल गांधी सातत्यावे केंद्र सरकारला आर्थिक पातळीवर होऊ शकणारे नुकसान तसेंच वैद्यकीय क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांवर सूचना करत असताना देशाचे पंतप्रधान मात्र जनतेला ठाळ्या, थाळ्या वाजवायला आणि दिवे लावायला सांगत होते. १२ फेब्रुवारी २०२० रोजी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला गंभीर परिणामाचा इशारा दिला होता आज एक वर्षानंतरही तीच परिस्थिती कायम आहे. मोंदींना मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस असून राहुल गांधींच्या सूचना ऐकल्या असत्या तर आज लाखो जीव वाचले असते, .  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्थभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांवी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. गरीब, असहाय्य जनतेच्या मृतदेहावर उभे राहून निवडणुकीचा प्रचार करणारा पंतप्रधान म्हणून देशाच्या इतिहासात नरेंद्र मोदींची नोंद होईल, अशी टीकाही त्यांनी केली.

कोरोवाला रोखण्यासाठी सध्यातरी लसीकरणाशिंवाय दुसरा पर्याय वाही. त्यामुळे जगभरात उपलब्ध असणाऱया लसींवा परवानगी देऊव देशातील लसीकरणाचा वेग वाढवावा अशी सूचना राहुल गांधी यांबी केली होती. त्यावेळी राहुल गांधी औषध कंपन्यांसाठी लॉबिंग करत असल्याचा पोरकट आरोप केला आणिं नंतर चार दिवसातच केंद्र सरकारने परदेशी लसींना परवानगी दिली. कोरोना लसीकरणासाठी वयाची अट शिंथील करून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची मागणी आम्ही केली आहे. सरकारनें त्यावर गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घेतला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल, अशी भी तोही त्यांनी व्यक्त केली.

नोटाबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली जीएसटीची अंमलबजावणी, कोणतीही पूर्वसूचना न देता व नियोजन न करता अचानक लावलेल्या त्नॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ऐतिहासिक रसातळाला गेली. तर लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरिबांच्या बॅक खात्यात रोख रक्‍कम जमा करण्याची सूचना राहुल गांधी यांवी केंद्र सरकारला केली होतीं पण बेंहमीच्या सवयोप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले गेले त्याची फळं देशातील गरीब जनता भोंगते आहे.


Post a Comment

0 Comments