रेमण्डच्या गृहप्रकल्पाचे काम रात्रभर सुरू; ठामपाची नोटीस


ठाण्यातील पोखरण रोड क्र १ वर्तक नगर येथील रेमंड कंपनीच्या जागेवर गृह तिर्माण प्रकल्पांतर्गत नवीन इमारत उभारण्याचे काम जोरात  सुरु आहे, मात्र याचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकवेळा सांगून देखील कंपनी व्यवस्थापन लक्ष देत नाही.   रात्री १०:३० वाजता काम बंद करावे असा नियम आहे.मात्र या नियमांला पायदळी तुडवण्यात येत आहे. गृहनिर्माण प्रकल्प लवकर व्हावा यासाठी रांत्रंदिवस काम सुरु आहे. मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात देखील हे काम सुरुच होते.  सिमेंट कॉक्रिंटची मिक्‍सर गाडी व लोखंडाचा ठोकण्याचा आवाजाने  बाजूस असणाऱ्या साईनाथ नगर परिसरातील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे ध्वनी प्रदूपण व वायू प्रदूषण या मुळे स्थानिक नागरिकांची घुसमट होत आहे. याबाबत २५ मार्च रोजी रात्री १२ वाजता केली. तेव्हा गस्तीवर असणारे जितू वाघमोडे यांच्या समवेत जाऊन साइटवर काम वंद करण्याची सूचना दिली होती. 

मात्र दुसऱ्या दिवशी दिनांक २६ मार्च रोजी रात्री काम पुन्हा सुरु होते. पुन्हा त्यांची तक्रार रात्री १२:०७ वाजता केली. त्या अनुषंगाने पोलीस मा नवले यांनी साईडवर काम वंद करण्याच्या सूचना देण्यासाठी गेले असता त्यांना रात्री  रेमंड गेट वरील सुरक्षारक्षक सुनील बोराडे यांनी आत मध्ये प्रवेश दिला नाही व वरिष्ठांचा आदेश असल्यामुळे आम्ही कोणाला आतमध्ये सोडणार नाही असे सांगितले आणि नवले यांना परत जावे लागले तरीसुद्धा संपूर्ण रात्री रेमंड मध्ये इमारत बांधकाम करण्याचे काम सुरू होते.  त्यामुळे रेमंड रीएलिटी बिल्डर वर पोलिसांच्या आदेशाचे पालन न करणे, रात्री काम करीत ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण करीत असल्यावद्दल गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेचे उपविभाग अध्यक्ष निखिल जाधव यांनी केली आहे. याबाबत ठाणे महानगर पालिकेने ९ एप्रिल रोजी सदर बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावली आहे. आपण करीत असलेल्या कामामुळे प्रदुषण होत असून याबाबत खुलासा करण्यास बजावले आहे. ठाणे महानगर पालिकेने याबाबत ठोस कारवाई केली नाही तर याबाबत आंदोलन करावे लागेल असा इशारा जाधव यांनी दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या