कोविड मृत्यूंच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडांवर शवदहन करण्याची विनामूल्य सुविधा

  6 गॅस शवदाहिन्या व्यतिरिक्त 17 अन्य स्मशानभूमीतही कोविड मृत्यूंच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडांवर शवदहन करण्याची विनामूल्य सुविधा लवकरच उपलब्ध! 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एकूण 62 स्मशानभूमी असून त्यापैकी मुरबाड रोड कल्याण प., बैलबाजार कल्याण प., लालचौकी आधारवाडी कल्याण प., विठ्ठलवाडी कल्याण पू. तसेच शिवमंदीर डोंबिवली पू., पाथर्ली डोंबिवली पू. या 6 ठिकाणी गॅसशवदाहिनी सह लाकडावरील बर्निंग स्टँडची सुविधा देखील उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त 17 अन्य स्मशानभूमीतही कोविड मृत्यूंच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडांवर शवदहन करण्याची विनामूल्य सुविधा लवकरच उपलब्ध करण्यात येत आहे. कोविड कालावधीत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी डोंबिवली प. येथील कुंभारखाणपाडा येथे गॅस शवदाहिनीसह नविन स्मशानभूमी उभारण्यास आयुक्तांनी मान्यता दिली असून त्याची निविदा प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या कोविड रुग्णालयात झालेल्या कोविड मृत्यूंचे अंत्यसंस्काराचे नियोजन करण्यात आले असून , मृतांचे दहन नजिकच्या स्मशानभूमीत करण्यात येणार आहे, त्यामुळे दहन प्रक्रियेसाठी होणारा विलंब टाळता येईल.

प्रेम ऑटो, कल्याण प., लाल चौकी, कल्याण प. , शिवमंदिर, डोंबिवली पूर्व येथील 10 बर्निंग स्टँड लवकरच दुरुस्त करण्यात येत असून नव्याने 2बर्निंग स्टँड बसविण्यात येणार आहेत. मोहने व चक्की नाका, कल्याण पूर्व येथे आर.सी.सी . स्मशानभूमी बांधण्याचे कार्यादेश देण्यात आले असून उंबर्डे, सापाड, वाडेघर, गौरीपाडा, ठाकुर्ली, माणगांव, सोनारपाडा व घेसर या 7 ठिकाणी नविन आर.सी.सी. स्मशानभूमी बांधण्याचे प्रस्तावित आहे. सर्व महत्वाच्या शवदाहिन्याच्या ठिकाणी माहिती दर्शक फलक लावण्यात आलेले आहेत. कोविड रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी महानगरपालिकेमार्फत गॅस शवदाहिन्या / लाकडे विनामुल्य स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या