महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी केले जयंतिनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन

 


मुंबई, 

 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त दादर येथील चेत्सभूमी येथे महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी पुष्पहार वाहून अभिवादन केले. याप्रसंगी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर केंद्रीय सामाजिक न्याय  राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष,आमदार नाना पटोले, खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार भालचंद्र  मुणगेकर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्‍त (शहर) संजीव जयस्वाल , नगरसेवक / नगरसेविका, उप आयुक्‍त (परिमंडळ - २) विजय बालमवार, 'जी/उत्तर' विभागाचे सहाय्यक आयुक्‍त किरण दिघावकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर  महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे मान्यवर पदाधिकारी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी हेही  समवेत उपस्थित होते. तसेच महापालिका मुख्यालय सभागृहातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांनी आज पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उप आयुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन ) प्रभात र॒हांगदळे, महापालिका उप चिटणीस सईद कुडाळकर हे मान्यवर उपस्थित होते.
 ठाणे महापालिकेच्या विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. तसंच टेंभी नाका येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या