Trending

6/recent/ticker-posts

१ ली ते ८ वी परिक्षा न घेता पुढच्या वर्गात, ९ वी आणि ११ वीबाबत अद्याप निर्णय नाही


 मुंबई: 

दिवसेंदिवस राज्यातील कोविड बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असुन आता लहान मुलांनाही याची लागण होत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनत आहे. तसेच ऑनलाईन शिक्षणाच्या पध्दतीतून राज्यातील १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नसल्याने या विद्यार्थ्याच्या परिक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय आज शालेय शिक्षण विभागाने घेतल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकताड-गोडसे यांनी ट्वीटरवरून दिली.

कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत सदरचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभमीवर सुरु झालेल्या शाळा बंद कराव्या लागल्या. तर काही भागात शाळाच सुरूच करता आल्या नाहीत. तरीही ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरु ठेवण्यात आले होते. मात्र शाळा सुरु करूनही आणि ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवूनही विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम शिकतून पुर्ण करता आला नाही. त्यामुळे १ ली ते ८ वी च्या ठिद्यार्थ्यांच्या परिक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ९ वी आणि ११ वीतील विद्यार्थ्यांच्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र त्यांच्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे तुर्त त्यांच्या परिक्षा रद्द जरी करण्यात आलेल्या नसल्या तरी त्या परिक्षा होतील याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाहीं. मात्र त्याबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितलें.

Post a Comment

0 Comments