नाशिक महानगरपालिकेच्या कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन गळती; अनेक रुग्ण दगावलेनाशिक  येथील महानगरपालिकेच्या कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने रुग्णांचे जीव टांगणीला आहे. या घटनेमुळे झाकीर हुसैन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर आहेत. सुरुवातीला 11 जणांच्या मृत्यूचे वृत्त आले होते, अवघ्या काही मिनिटांत मृतांचा आकडा दुपटीने वाढला. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 13 के एल क्षमतेचा ऑक्सिजन टँक लावण्यात आला आहे. हाच टँक बुधवारी लीक झाला. ऑक्सिजनच्या टँकची दुरुस्ती करण्यात आली आहे.या रुग्णालयात ऑक्सिजनवर 131 रुग्ण आहेत. तर अत्यवस्थ रुग्ण 15 व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला आहे.महापालिकेचे हे संपूर्ण कोविड रुग्णालय असून सुमारे दीडशे रुग्ण येथे दाखल आहेत. अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर आहेत. ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला असून त्यांना अन्य ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातून तातडीने 15 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी झाकीर हुसेन रुग्णालयात पाठविण्यात येत आहे.

 या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  'कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने 22 रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. 

एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत. तसेच, या घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करतो. 


नाशिक मधील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यापासून ते टँकर भरेपर्यंत सर्व कामे खासगी ठेकेदारांना देण्यात आली असल्याची माहिती ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते पुढे म्हणाले की टँकरमधील ऑक्सिजन टाकीत भरत असताना वॉल बंद करण्यात आला होता तो बंदच राहिला. त्यामुळे व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले. हा मनुष्यवध असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शासनाचा हा दुर्लक्षपणा असून या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आदरांजली वाहिली तसेच या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर शासन कारवाई करेल अशी अपेक्षा ही त्यांनी या वेळी व्यक्त केली.


 नाशिक मध्ये दुर्घटना झाली त्याला आधी राज्य सरकारला दोष द्यायचा होता, नंतर दरेकरला प्रश्न विचारणाऱ्या अँकरने सांगितलं की हॉस्पिटल मनपाच्या अख्यारीत येतं आणि मनपा मध्ये सत्ता भाजपची आहे, त्यानंतर पक्षाचं राजकारण न करता  यंत्रणेला दोष द्या, आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा बोलू लागला. ग्राउंडवरून रिपोर्टिंग करणाऱ्याने आठवण केली, नाशिक मध्ये भाजपचे तीन आमदार आहे, महापौर भाजपचा आहे, ६६ नगरसेवक ही भाजपचे आहेत, ते अजून घटना स्थळी पोहचले नाहीत, इतर पक्षांचे गटनेते पोहचले, तर त्याने रिपोर्टिंग करणाऱ्यावर डाफरत पुन्हा राजकारण करू नका, राज्या शासनाची जबाबदारी आहे, पालकमंत्री कुठे झोपलेत ?ऑक्सिजन पुरवठा कुठे कमी पडतोय, कुठे व्हेंटिलेटर कमी पडतायत याची व्यवस्था करण्याची. कदाचीत कालची उतरली नसेल, म्हणून ह्याला कोणीतरी तोंडावर सोडा मारून सांगितल पाहिजे की, देशभर वेगवेगळ्या राज्यातून ऑक्सिजन पुरवठा कमी पडतोय म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने केंद्राला समजावून सांगून झालंय, पण केंद्रीय मंत्री पियुष गोयल बोललाय की हॉस्पिटलने ऑक्सिजन योग्य वापर केला पाहिजे. थोडक्यात देशभर योग्य ऑक्सिजन पुरवठा न होण्याला कारण फक्त केंद्रसरकार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या