उच्च शिक्षण विभागाच्या CET च्या विद्यार्थ्यांंना बीआरएसपीमुळे मिळाला दिलासा


नुकतेच डिसेंबर २०२०  मधे उच्च शिक्षण विभागाच्या CET चे निकाल लागले आहेत, सदर CET ची प्रक्रिया (फॉर्म भरण्यापासुन ते परीक्षा घेऊन, निकाल लागू पर्यन्त) लॉकडाउन च्या काळात घेतली असल्याने अनेक विद्यार्थ्यांची Cast Validity झालेली नाही, याचा जास्त फटका हा SC/ST विद्यार्थ्यांना बसत होता. यासम्बन्धी अनेक तक्रारी whats apps, ट्विटर आणि E-mail च्या माध्यमातून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.डॉ. सुरेश माने यांच्याकड़े आल्या होत्या.

परंतु या कालावधी डॉ.सुरेश माने कोरोना पॉजिटिव झाल्यामुळे ही बाब काहीशी दुर्लक्षीत झाली मात्र हॉस्पिटल मधून डिस्चार्ज होताच ऍड डॉ सुरेश माने यांनी सदर बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ दि.22 मार्च 2021 रोजी आपल्या निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश सचिव सतिश बनसोडे यांच्यासोबत सदर विषयावर चर्चा केली. तसेच  संबंधित मंत्री उदय सामंत यांची दि.23 मार्च 2021 रोजी दुपारी 1 वाजता ची भेट ठरविली.  त्याप्रमाणे सतिश बनसोडे यांच्यासह BRSP शिष्टमंडल यांनी उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत  यांची भेट घेऊन सदर बाब लक्षात आणून दिली. चर्चेअंती मंत्री महोदयांनी सदर विभागीय सचिव यांना दूरध्वनीद्वारे दिशा निर्देश दिले की ज्यांनी ज्यांनी जातवैद्यतासाठी ऑनलाइन फॉर्म भरले असतील त्या सर्वांना पावतीच्या आधारे प्रवेश देण्यात यावा तसेच ज्यांनी अजूनही जातवैद्यता प्रमानपत्रासाठी ऑनलाइन फॉर्म भरला नाही त्यांना 30 मार्च पर्यंत वेळ वाढऊन देण्यात यावी, लवकरच यासम्बन्धी अध्यादेश काढला जाईल, असे मंत्री महोदयांतर्फे सांगण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad