सामाजिक अर्थसहाय्य योजना जनजागृतीसाठी विशेष मोहीम


ठाणे
राज्यातील अनुसूचित जाती तसेच बौध्द शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी कृषी विभागाची डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजनाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता तसेच जिल्हयाच्या विविध भागात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कोरोना लसीकरण सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, सामाजिक अर्थसहाय्य विभागाच्या विविध योजना आदींच्या चित्रफिती द्वारे प्रदर्शित करण्याकरीता चित्ररथ निर्माण करण्यात आला आहे.   या  चित्ररथाला  अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे  यांनी आज हिरवा झेंडा दाखविला. यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण बळभिम शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे,तहसिलदार वृषाली पाटील, तसेच जिल्हाधिकारी  कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी 2.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान,जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये,वीज जोडणी आकार व सुक्ष्म संच(ठिबक अथवा तुषार)यासाठी एकत्रित 3.35 लाख किंवा 3.10 लाख अनुदान,शेतकऱ्याच्या अस्तरीकरणासाठी 1 लाख रुपये, यांची जनजागृती करण्यात येत आहे. रमाबाई आवास (घरकुल) योजना- 269 चौरस फुटाचे पक्के घर,घराच्या बांधकामासाठी ग्रामीण भागात 1 लाख 32 हजार रुपायांपर्यंत खर्च मर्यादा,नगरपालिका/नगर परिषद/ महानगर पालिका क्षेत्रात 2.5 लाख रुपये खर्च मर्यादा,ग्रामीण भागातील लाभार्थीना आपला हिस्सा भरण्यासाठी आवश्यकता नाही, इतरांनी भरावयाची त्याच्या हिश्याची रक्कम नगरपालिका क्षेत्रात केवळ 7.5 टक्के व महानगरपालिका क्षेत्रात 10 टक्के,दारिद्रयरेषेवरील पात्र लाभार्थीना सुध्दा योजनेचा लाभ,ग्रामीण भागात घरकुलासाठी पात्र असणाऱ्या पंरतु जागा नसणाऱ्यांसाठी 50  हजार रुपयापर्यत अर्थसाहाय्य ,याची माहिती देण्यात आली आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे स्वप्न- विद्यार्थ्यास दरमहा रु.230 ते 450 या दराने निर्वाह भत्ता व शिक्षण शुल्क,परिक्षा शुल्क व इतर शुल्क देखील मिळणार,वसतिगृहातील विद्यार्थ्यासाठी दरमहा रु.380 ते 1200 रुपये निर्वाहभत्ता थेट जमा,या बाबत माहिती देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे यांच्यावतीने न्यु एज मिडिया पार्टनर लि.या संस्थेच्या माध्यमातून  जिल्ह्यातील  गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. लोककल्याणकारी योजना जनेतेपर्यंत पोहचवण्याचे चित्ररथ प्रभावी माध्यम असून याचा नागरीकांना लाभ घ्यावा असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या