Top Post Ad

जिल्हात ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ


ठाणे 
 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ती अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब व जोखीम प्रवण महिलांना समृद्ध आत्मसन्मानाचे व सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी राज्य शासनाच्या वतीने  ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण’ अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या ग्रामसंघानी ( बचतगट ) उद्योग- व्यवसाय करावा यासाठी कायमस्वरूपी अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आज महिला दिनाचे औचित्य साधत प्रातिनिधिक स्वरुपात प्रेरणा महिला संघ, श्रावणी महिला ग्रामसंघ, शिवकन्या महिला ग्रामसंघाना अनुक्रमे ३ लाख ६० हजार आणि ३ लाखाच्या धनादेश स्वरुपातल्या  निधीचे वाटप जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते करण्यात  आले. यावेळी  महिला व बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील,  कृषि,पशू व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले, जिल्हा परिषद सदस्य रुपाली झुगरे, वैशाली शेवाळे, जयश्री सासे, उपस्थितीत होते.  

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ती अभियानाची अमलबजावणी ठाणे जिल्ह्यात सन २०१७ पासून सर्व तालुक्यात इंटेन्सिव पद्धतीने सुरू आहे. ग्रामीण महिलांचे सामाजिक तसेच आर्थिक समावेशन करून महिलांचे सक्षमीकरण करणे हा प्रामुख्याने या योजनेचा उद्देश आहे. या योजनेत महिलांचे गावात गट निर्माण करून त्यांचे गावपातळीवर ग्रामसंघ तयार केले जातात. सध्यस्थितीत ठाणे जिल्ह्यात एकूण १०६२२ गट ७९३ ग्रामसंघ व २९ प्रभागसंघ आहेत. या महिला एकत्रितपणे विविध लघु उद्योग- व्यवसाय करतात. यामध्ये भाजीपाला लागवड, दुकान व्यवसाय, खाद्यपदार्थ व्यवसाय, शेती निगडीत व्यवसाय, घरपयोगी व्यवसाय असे नानाविध उपजीविकेचे व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावतात

उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका आणि मदतनीसांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सोमवारी मो.ह.विद्यालयाच्या सभागृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, महिला व बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील,  कृषि,पशू व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, जिल्हा परिषद सदस्य रुपाली झुगरे, वैशाली शेवाळे, जयश्री सासे यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.  राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल कल्याण) संतोष भोसले यांनी केले. याप्रसंगी महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देणारी मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवराच्या हस्ते झाले. खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे निवेदन पर्यवेक्षिका रतन कुऱ्हाडे आणि वैशाली राठोड यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी कोविड काळात अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी केलेल्या कामाचे कौतुक करत पुरस्कार मिळालेल्यांचे अभिनंदन केले. महिला दिनी बोलताना श्रीमती लोणे म्हणाल्या, प्रत्येक कुटुंबात महिलांचे अनन्यसाधारण महत्व असून मला देखील दोन लेकी असल्याचा सार्थ अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, कोविड काळात काम करणे अवघड होते, मात्र एकात्मिक बाल विकास सेवेच्या कर्मचाऱ्यांनी तळागाळातील नागरिकांना सेवा देण्याचे काम केले. त्यांचे काम दर्जेदार आणि सर्वासाठीच प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी महिला व बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महिला या अबला नसून सबला आहेत. शिवकाळापासून आतापर्यंत महिलांच्या कार्यकर्तुत्वाची पताका तेजाने फडकत आहे. हा जाज्वल्य इतिहास साक्षी ठेवून जिल्ह्यातील अनेक कर्तबगार महिलांचे कार्य कौतुकास्पद आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते म्हणाल्या की प्रत्येक स्त्रीचा प्रवास, तिचा संघर्ष हा वेगळा आहे. खडतर परिस्थितीतूनच असंख्य महिला पुढे आल्या आहेत. एस.टी कंडक्टर ते कलेक्टर, ग्रामपंचायत सदस्य ते राष्ट्रपती अशी गरुडझेप महिलांनी घेतली आहे. प्रत्येक काळानुसार स्त्रियांच्या समस्या बदलत आहेत. आताच्याघडीला सर्वाची मन जपणारी, काळजी घेणाऱ्या महिलांनी स्व:ताच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे सांगत प्रत्येक घरातील पुरुषांनी तिच्या कामाचे केवळ कौतुक करून तिला देवत्वस्वरूप न आणता सर्व स्तरावर सहकार्य देखील केले पाहिजे अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

पुरस्कार प्राप्त अंगणवाडी सेविका- मंगल सुधाकर थोरात, छाया बळीराम कोर, रंजना नारायण पाटील, आशा रघुनाथ विशे, वैशाली पद्माकर देशमुख, मिना संजय बांगर, रेश्मा रघूनाथ शिंगोळे, कल्पना कैलास गोंधळे, कमल चंदर पाटील,

पुरस्कार प्राप्त अंगणवाडी मदतनीस- सुमन नामदेव पवार, वनिता सुदाम वाळंज, रंजना शाम देशमुख, सुरेखा सुरेश डिंगोरे, मालती काशिनाथ वाघ, संगीता नारायण कामडी, दलिता नागो भला, कामिनी अरुण जाधव, वंदना दयानंद भोईर

पुरस्कार प्राप्त पर्यवेक्षिका /  मुख्य सेविका- अस्मिता आत्माराम सुंडकर, निशा तारमळे, सुलभा अडसुळे, वंदना विजय जाधव, रेखा जगताप, प्राची मोहन म्हसकर आदिना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com