शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिबा देत महाराष्ट्रातून मिट्ठी आंदोलनाला सुरुवात


महात्मा गांधीजींनी दांडी मार्च नंतर मुंबईत आले असता वडाळा मिठागर येथे मीठाचा सत्याग्रह केला होता!  त्याच ठिकाणी भर दुपारच्या ३ च्या उन्हात, मिट्टी सत्याग्रहास सुरुवात झाली. देशातील शेतकरी आंदोलनाला 100 हून अधिक दिवस झाले मात्र सरकार त्याकडे जाणीवपूर्वक  दुर्लक्ष करीत आहे. आंदोलनामध्ये अनेकांचे जीव गेले. मात्र सरकार या काळ्या कायद्यांबाबत कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही. आंदोलकांना दुर्लक्षीत करून हे काळे कायदे शेतकऱयांवर लादण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याविरोधात आज महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी शेतकऱ्यांना पाठिबा देत मिट्ठी आंदोलनाला सुरुवात केली.  मुंबईत अपेक्षेपेक्षा छान प्रतिसाद. जी जी पारीख, किशन गरोडीया, लता प्र म, धनंजय शिंदे, राजू भिसे, फिरोज मिठीबोरवाला, सलीम भाटी, जगदीश खैरालिया, वर्षा वि वि, पुनम कनोजिया, फआद अहमद, गुड्डी आदी सहीत अनेक भागातील अनेक साथी सहभागी यामध्ये सहभागी झाले होते. ! स्थळ होतं , 

यावेळी दर १२ मार्चला इथे जमुया ! सत्याग्रहाचे स्मारक इथे उभारुया !! असा संकल्प करण्यात आला. मातीचा टीळा लावून, कलशात मुठ मुठ माती जमा करत सर्वांनी घेतली मिट्टीची शपथ व पुढील वाटचालीचा संकल्प ! असाच कार्यक्रम संध्याकाळी झाला ठाण्याच्या गजबजलेल्या बाजारपेठेत. संयोजन दिल्ली कीसान ज्योत यात्री अजय भोसले व सुनिल दिवेकर. बिरपाल भाल, जगदीश खैरालीया आदींची तडाखेबंद भाषणे झाली. 

वडाळा येथे झालेल्या मिट्ठी आंदोलनात सर्व आंदोलनकर्त्यांना शपथ देण्यात आली. सहकार आंदोलनाची शताब्दी आणि दांडी यात्रेद्वारा झालेल्या मिठाच्या सत्याग्रहाला स्मरून, माझ्या काळ्या आईची, मातीची शपथ घेऊन,  मी संकल्प करतो/ते की,  दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रही आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. त्यांच्या मागण्या मान्य करून केंद्र सरकारने तीन शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत अशी माझी मागणी आहे. शेतकऱ्यांसोबतच सर्व देशवासियांची अन्नसुरक्षा अबाधित राहावी अशीच धोरणे आखली जावीत असा माझा आग्रह आहे.

या देशीतील जल, जंगल, जमीन, नैसर्गिक संपदा आणि त्यावर आधारित आजीविका वाचवण्यासाठी मी अहिंसेच्या सत्याग्रही मार्गाने प्रयत्न करेन.आज सुरू असलेली लोकशाही व संविधानाची गळचेपी थांबवून खरे स्व-राज्य निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करेन.त्यासाठी, गावसमाजाला केंद्रस्थानी मानून, विकेंद्रित विकासाची कास धरत, पर्यावरणाला जपत, अंतिम माणसाला विकासाची पहिली संधी मिळावी यासाठी मी रचनात्मक प्रयत्न करेन.जाती, धर्म, प्रांत, भाषा, लिंग याआधारे मी कुठलाही भेदभाव करणार नाही.माझे सर्व कार्य मी प्रेम व अहिंसेच्या सत्याग्रही मार्गाने करेन. 

शेतकरी आंदोलानाला समर्थन म्हणून जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाने गांधीजींच्या दांडी यात्रेच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या मिट्टी आंदोलनाला ठाण्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. समता विचार प्रसरक संस्था, वाल्मिकी विकास संस्था आणि श्रमिक जनता संघ या संघटनांतर्फे ठाण्यातील वाल्मिकी चौक येथे मिट्टी सत्याग्रहाचा कार्यक्रम झाला. या वेळी नागरिकांनी एक- एक मूठ भर माती कलशात जमा केली आणि मातीचा टिळा लावून ‘मी ही मिट्टी सत्याग्रही’ अशी शपथ घेतली. या वेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना  समता विचार संस्थेचे विश्वस्त आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ म्हणाले, १२ मार्च १९३० रोजी गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी यात्रा सुरू केली होती. निसर्गातून मिळणार्यां मिठावर ब्रिटीशांनी लावलेल्या अन्याय्य कराला विरोध करण्यासाठी गांधीजींनी सुरू केलेला हा सत्याग्रह जन आंदोलन बनून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कारणीभूत ठरला होता. आज आपले शेतकरी सुद्धा त्यांच्यावरील अन्याय्य कायदे रद्द करण्यासाठी गेले शंभर दिवस आंदोलन करत आहेत. आपल्या मातीसाठी संघर्ष करणार्यां आमच्या किसान बांधवांशी एकजूट दर्शविण्यासाठी हा आमचा मिट्टी सत्याग्रह १२ मार्च ते ६ एप्रिल या काळात संपूर्ण देशभर चालणार आहे. 

श्रमिक जनता संघाचे महासचिव जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया या प्रसंगी म्हणाले, केंद्रातील भाजपा सरकार बहुमताच्या जोरावर शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि युवकांच्या विरोधात विविध अध्यादेश काढून कायदे करत आहेत आणि देशातील जमीन आणि नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या भांडवलदारांच्या आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घालत आहेत. म्हणून देशातील विविध सामाजिक संस्था, कामगार संघटना, शेतकरी संघटना शेतकरी – मजदूर एकजुटीचा नारा देत वस्ती, गाव, शहरातील जनतेकडून माती जमा करून ती कलशात भरून दिल्लीला पाठवणार आहेत आणि ‘मी ही मिट्टी सत्याग्रही’ अशी शपथ घेऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणार आहोत. 

या वेळी वाल्मिकी विकास संस्थेचे विरपाल भाल, समता विचार प्रसारक संस्थेचे अजय भोसले यांनीही जनतेशी संवाद साधला. समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी, सचिव हर्षलता कदम, खजिनदार सुनील दिवेकर, प्रवीण खैरालिया, मीना पिंगळे आदिंनी कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत केली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या