सेना-भाजपच्या भांडणात ठामपाने घेतला सुरक्षा रक्षकांचा बळी

 भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांनी केलेल्या टीकेला झुंडगिरीने उत्तर देण्याचा आततायीपणा सत्ताधारी शिवसेनेऐवजी गरीब बिचाऱ्या सुरक्षा रक्षकांना भोवला आहे.  डुंबरे घेराव प्रकरणी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या ८ जवानांना तात्काळ सेवेतुन कमी करून कारवाई करण्यात आली.   पालिका मुख्यालयात झुंडी शिरण्याला सेनेचाच एक नगरसेवक जबाबदार असुन यामध्ये आमची काहीच चूक नसल्याचा पवित्रा सुरक्षारक्षकांनी घेतला आहे. जवानांचा नाहक बळी गेला असून शिवसैनिकावर महापालिका कारवाई करणार की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आधीच को-रो-नाची टांगती तलवार डोक्यावर आहे. त्यात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. कुटुंबाची उपासमार होत आहे. मात्र अशा वेळीच पालिकेने त्या शिवसैनिकांवर कारवाई करण्याऐवजी पहिला बळीचा बकरा सुरक्षा रक्षकांना केला असल्याने ठाण्यातील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत ठाण्यातील काही संघटनांनी पुढाकार घेत पालिकेला जाब विचारण्याचे ठरवले आहे.  

महापालिका मुख्यालयात १२ मार्च रोजी नियमाचे पालन न करता शिवसेनेच्या नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यानी गर्दी करत डुंबरे यांच्या कार्यालयात जाऊन हंगामा केला.याची गंभीर दखल घेत डुंबरे यांनी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केल्यानंतर नगरसेवकांसह ४० जणावर गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र सुरक्षारक्षकांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी डुंबरे यांनी केली होती, त्या मागणीची दखल घेत पालिका प्रशासनाने आदेश काढले असून आठ सुरक्षा रक्षकांना महापालिका सेवेतुन काढुन टाकले.तसेच त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याजागी सक्षम आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी द्यावेत असे पत्र मुख्य सुरक्षा अधिका-यांनी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या उपायुक्त देवराज यांना दिले  आहे.


दरम्यान शुक्रवारी कोरोना कालावधीत म्हणजे नोव्हेंबर महिन्यात ऑनलाईन महासभेच्या वेळेस सभागृहाबाहेर गर्दी करून ऑफलाईन सभा घ्यावी म्हणून हातात फलक घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या भाजपच्या तब्बल 17 नगरसेवकांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  काही दिवसांपूर्वी भाजपने शिंवसेनेच्या नगरसेवकांसह 40 पदाधिकाऱ्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात 188 अन्वये  गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता भाजपच्या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी  दिव्यात राहणारे सूर्यकांत पौळ हे महाराष्ट्र सुरक्षा बलाअंतर्गत सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून ठाणे महापालिकेतकार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत, 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या ओनलाईन महासभेच्या वेळेस ही महासभा ऑफलाईन घ्यावी या मागणीसाठी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहाबाहेर एकत्र येऊन हातात फलक घेऊन घोषणाबाजी करून आंदोलन केले होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महासभेत देखील अशाच पध्दतीने त्यांनी थेट कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आंदोलन केले होते. असे या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

मागील नोव्हेंबर महिन्यात देखील कोरोनाची परिस्थिंती असल्याने गर्दी करू नये, जमाव करू नये, सोशल डिंस्टन्सिंगचे पालन करावे. असे असताना देखील या नगरसेवकांनी त्याचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत नमुद   करण्यात आले आहे. त्यानुसार भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे, संदीप लेले, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, अर्चना मनेरा, मिलिंद पाटणकर, संजय वाघुले, मुकेश मोकाशी, भरत चव्हाण, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, नंदा मागील नोव्हेंबर महिन्यात देखील कोरोनाची परिस्थिती असल्याने गर्दी करू नये, जमाव करू नये, सोशल  डिंस्टन्सिंगचे पालन करावे. असे असताना देखील या नगरसेवकांनी त्याचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत नमुद  करण्यात आले आहे. त्यानुसार भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे, संदीप लेले, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, अर्चना मनेरा, मिलिंद पाटणकर, संजय वाघुले, मुकेश मोकाशी, भरत चव्हाण, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, नंदा  पाटील, आशा शेरबहादुर सिंग, नारायण पवार, स्त्रेहा आंद्रे, दीपा गावंड आणि अशोक राऊळ यांच्यावर महाराष्ट्र  पोलीस कायदा कलम 37 (3), 135 प्रमाणे तसेच कलम 188 भादंवि प्रमाणे तसेच साथीचे रोग अधिनियम सन  1897 चे कलम व3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 इतकेच नव्हे तर  सिंघानिया शाळेसमोरील पादचारी पुलाच्या बांधकामावरुन शिवसेनेवर फंड गोळा करण्याचे आरोप करणार्‍या भाजपाचे गटनेते आणि प्रसिध्दी प्रमुखाच्या विरोधात अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस शिवसेनेने पाठवली आहे. 15 दिवसात माफी मागितली नाही तर दाव्याला सामोरे जा, असा इशारा देण्यात आला आहे.  शिवसेनेचे ठामपातील गटनेते दिलीप बारटक्के यांनी ही नोटीस पाठवली आहे. सिंघानिया शाळेसमोरील पादचारी पुलासह तीन पूल बांधून शिवसेना निवडणूक फंड गोळा करते, असा आरोप भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला होता. त्याची प्रेस नोट प्रसिध्दी प्रमुख सागर भदे यांनी काढली होती. त्यांनी वर्तमानपत्रात ती प्रसिध्द केल्यामुळे शिवसेनेसारख्या राजकीय पक्षाची बदनामी झाली आहे. आरोप करताना कुठलेली पुरावे भाजपाच्या या दोन पदाधिकार्‍यांनी दिले नाहीत, असा दावा करुन  बारटक्के यांनी या दोघांना 15 दिवसात बिनशर्त माफी मागावी, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, अशी नोटीस शिवसेनेचे वकील राजन साळुंखे यांनी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA