Top Post Ad

केंद्राच्या कृषी कायद्याला अधिवेशनातच विरोध करावा

महाराष्ट्रात हा काळा कायदा लागू होणार नाही - प्रकाश आंबेडकर

मुंबई
राष्ट्रवादी व कोंग्रेसच्या युती शासनाने २००६ साली महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विनिमय व विनिमय सुधारणा) कायदा केला आहे. केंद्राचा आजचा काळा कायदा हा याच कायद्यावर आधारित आहे. म्हणून राष्ट्रवादी व काँग्रेस युती सरकारने २००६ साली केलेला कृषी कायदा रद्द झाला पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने आजच्या धरणे आंदोलना द्वारे केली आहे.  कृषी हा राज्याचा विषय आहे व त्यामुळे केंद्र शासनाला कृषी कायदा करता येत नाही. परंतु एखाद्या राज्याने कृषी कायदा केला तर तो योग्य आहे, 

या सबबी खाली तो संपूर्ण देशभर लागू केला जाऊ शकतो. वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या आंदोलनाची हि मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठराव करावा की, “महाराष्ट्र हा कायदा तर स्वीकारणार नाहीच व केंद्र शासनानेही हा कायदा मागे घ्यावा”.राष्ट्रवादी व कॉंग्रेस या दोघांचे या कायद्या बाबतीतील विरोधाचे धोरण हे दुटप्पी आहे. २००६ साली राष्ट्रवादी व कॉंग्रसने केलेला कायदा आज भारत सरकारने लागू केला आहे. ही गोष्ट आम्ही लोकांसमोर आम्ही आणू इच्छितो. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

 दिल्लीमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून केंद्र सरकारने केलेल्या कृषी विरोधी तीन काळ्या कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठींबा दर्शवण्यासाठी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांवर वंचित बहुजन आघाडीच्यावर्तीने आज विविध ठिकाणी धरणे आंदोलनं  करण्यात आले. कळवा नाका येथे एकत्र येऊन पुढे कौर्ट नाका जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यामध्ये  १) जयवंत बैले    ठाणे जिल्हा महासचिव २ )  रूपेश हाटे       कळवा विभाग प्रमुख       वंचित बहुजन आघाडी ३) सुनीता ताई रणपिसे     ठाणे शहर अध्यक्ष महिला आघाडी   ३) शकुंतला अवसरमोल - ठाणे शहर उपाध्यक्ष   ४) भाग्यश्री गायकवाड- ठाणे शहर उपाध्यक्ष ५) प्रतीका वायदंडे- ठाणे शहर उपाध्यक्ष ६) शमा शेख ठाणे शहर महासचिव मंगला बिरारे, सविता खंडाईत, नेहा खरात रघु भोसले साहेबप्रशांत वामन खरात ठाणे सचिव दीपक जाधव ठाणे सचिव विनोद ढवळे धनाजी कांबळे संतोष संकपाळ घोलप काका गणपती पाडा चंद्रकांत कांबळे दिलीप गजानन जाधव किशोर चव्हाण किशोर ढवळे विजय चंदनशिवे नितीन चंदनशिवे अनिल जाधव गुणिवांत राऊत  प्रदीप नील राकेश हाटे इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होेते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com