Top Post Ad

ठाण्यात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन नाही


ठाणे
 ठाणे महापालिका क्षेत्रात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असणाऱ्या ठिकाणीच निर्बंध घालण्यात आले असून शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आलेला नाही तरी ठाणेकरांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.  सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आला नसून ज्या आस्थापना सुरु आहेत त्या आस्थापना यापुढेही सुरु राहणार आहेत. तरी ठाणेकरांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सींग, सॅनिटायझरचा वापर आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
    
  सध्या महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाय योजना करण्यात येत आहेत. ज्या परिसरात कोरोनाचा संसर्ग जास्त आहे त्या परिसरात हॅाटस्पॅाटची निर्मिती करण्यात आली आहे. या हॅाटस्पॅाट क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कोविड १९ चे रूग्ण सापडले आहेत त्या ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. या सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामध्येच निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग आहे ती इमारत, त्या इमारतीमधील मजला तिथेच ३१ मार्च २०२१ पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणचे सर्व व्यवहार यापूर्वी जसे सुरू होते त्यानुसार सुरू राहतील असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. 
      
    शहरात ३६ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित 

केंद्र  व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ६० वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स, विविध व्याधीग्रस्त नागरिक यांचे वेळेत लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी महापालिकेच्यावतीने शहरात ३६ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलीं असून ४ खासगी रूग्णालयातही लसीकरण सुरु करण्यात आले आहे. दरम्यान जागतिक महिलादिनाच्या औचित्य साधून शहरात आजच्या दिवशी पाच लसीकरण केंद्रांवर महिलांसाठी विशेष सुविधा पुरविण्यात आली होती. 

      शासनाच्या निर्देशानुसार शहरातील ६० वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स, विविध व्याधीग्रस्त नागरिक यांचे लसीकरण वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेने व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या आरोग्य  केंद्रांसोबत खाजगी हॉस्पिटलचा देखील या लसीकरण मोहिमेत समावेश केला आहे. यामध्ये महापालिकेच्यावतीने शहरात ३६ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलीं आहेत. या सर्व ठिकाणी सर्वच लाभार्थ्यांना वेळेत लस मिळावी तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आता नवीन ४ खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील लसीकरण केंद्रे लुरू करण्यात आली आहेत. 
      
          महापालिकेच्यावतीने ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हब, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पोस्ट कोव्हीड सेंटर, मेंटल हॉस्पिटल, कौसा हॉस्पिटल, हाजुरी, सह्याद्री, आंबेडकर भवन, वाडिया, किसननगर, रोसा गार्डेनिया,कौसा आरोग्य केंद्र, कोपरी मॅटर्निटी, अतकोनेश्वर आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक हेल्थ सेंटर,आझाद नगर आरोग्य केंद्र, बाळकूम आरोग्य केंद्र, सी आर वाडिया आरोग्य केंद्र, गांधी नगर, कळवा,कौसा आरोग्य केंद्र, किसन नगर, लक्ष्मी  चिराग नगर आरोग्य केंद्र,  लोकमान्य कोरेस आरोग्य केंद्र. माजिवडा आरोग्य केंद्र, मनोरमानगर, मानपाडा, नौपाडा, शीळ आरोग्य केंद्र, शिवाजीनगर आरोग्य केंद्र, उथळसर आरोग्य केंद्र, वर्तकनगर आरोग्य केंद्र, सावरकर नगर आरोग्य केंद्र आणि आनंदनगर आरोग्य केंद्र आदी ठिकाणांचा समावेश आहे. 
          
          खाजगी रूग्णालयांमध्ये सिद्धिविनायक रुग्णालय, वेदांत हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल,  काळसेकर रुग्णालय,प्राइम होरायझन हॉस्पिटल, हायवे हॉस्पिटल, पिनॅकल ऑर्थोकेअर हॉस्पिटल, हाईलँड हॉस्पिटल आणि  कौशल्य रुग्णालय आदी रुग्णालयांचा समावेश आहे. 
दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आज पाच लसीकरण केंदेरांवर महिलांसाठी विशेष सुविधा पुरविण्यात आली होती. यामध्ये सी. आर. वाडिया, किसननगर आरोग्य केंद्र, लोकमान्य आरोग्य केंद्र, कोरस, रोझा गार्डिनिया आणि कौसा आरोग्य केंद्र आदींचा समावेश होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com