अंबानीच्या हेलिपॅडसाठी स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण - नाना पटोले


राज्यात व देशात असलेल्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणून भाजपानेच अंबानी मुद्यावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानीच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळादी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे, 

अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी सापडली. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच त्यांची वैयक्‍तीक सुरक्षा व्यवस्था असताना ती गाडी तिथपर्यंत पोहचलीच कशी? हा प्रश्न आहे. २००९ साली अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणात ज्याचे नाव समोर आले त्याचा मृत्यू  दुस-याच दिवशी झाला होता, याची आठवणही पटोले यांनी करून दिली. 

रामदेव बाबांच्या पतंजली समुहाच्या हर्बल अँड फूड पार्कसाठी तसेच अनिल अंबानीच्या उद्योगासाठी नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये राज्य सरकारने नाममात्र दराने जमीन दिली होती परंतु त्या जागेवर अद्याप उद्योग उभे राहिलेले नाहीत. शेतकऱ्यांची लाखमोलाची जमीन कवडीमोल भावाने देऊनही त्यावर अद्याप उद्योग का उभे राहिले नाहीत? त्या जमिनीवर उद्योग कधी उभे  राहणार ?, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला.

मिहान प्रकल्पामधील २३० एकर जमिनीवर रामदेवबाबांचा पतंजली समूह हर्बल अँड फूड पार्कची निर्मिती करणार होता, रामदेवबाबांना ही जमीन ६६ वर्षांसाठी अतिशय कवडीमोल भावात दिली होती. या उद्योगामुळे ५० हजार रोजगार निर्मिती होईल तसेच दररोज ५ हजार कोटींचा कच्चा माल खरेदी केला जाईल असा दादा करण्यात आला होता. परंतु चार वर्षे झाली तरी अद्याप या जागेवर पतंजलीचा उद्योग उभा राहिलेला नाही. अनिल अंबानी यांच्या रिलायंस डिफेन्स कंपनीसाठीही मिहानमध्ये २८९ एकर जमीन देण्यात आली आहे. या उद्योगातूनही प्रत्यक्ष २००० तर अप्रत्यक्ष १५ हजार रोजगार निर्मिती होईल असा दावा करण्यात आला होता पण हा प्रकल्पही अद्याप उभा राहिलेला नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, रामदेवबाबा, अनिल अंबानींसह ज्यांना ज्यांना उद्योगनिर्मितीसाठी सरकारने जमिनी उपलब्ध करून दिल्या. पण त्या जागेवर कोणत्याही प्रकारचे उद्योगधंदे उभे राहिले नाहीत त्याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. 

सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना आरक्षणासंदर्भात  कुठलेही अधिकार राहिलेले नाहीत असे स्पष्ट केले. मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा हा या घटना दुरुस्तीनंतर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही शुद्ध फसवणूक असून मराठा समाजाचा घात देवेंद्र फडणविसांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांनी केंद्राला सांगून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 

मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, कांग्रेस पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही असून त्यासंदर्भात  मोठ्यातले मोठे वकील लावायचे असल्यास सरकारने लावावे आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आग्रही भूमिका घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावरील राजकारण थांबवून केंद्रातील आपल्या पक्षाच्या सरकारला सांगून ठोस भूमिका  घ्यावी व मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. मराठा आरक्षणाचा गुंता हा भारतीय जनता पक्षानेच वाढवून ठेवला आहे. हे ८ मार्चला सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीतून उघड होत आहे. सामाजिक आणि आर्थिक मागास जातींना संविधानातील तरतूदीनुसार न्याय देण्यासाठी मागासवर्गीय आयोग नेमून कायदा करण्याचा  राज्यांचा अधिकारच केंद्र सरकारने काढून घेतला आहे हे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष, आरएसएस यांना आरक्षणच संपुष्टात आणावयाचे आहे हे लपून राहिलेले नाही. त्यासाठी अशी षडयंत्रे रचली जात आहेत. असेही प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

------------------------

"देवेंद्रजी,आज मी निशब्द झालोय.." आजचा सभागृहातील आपला बाणेदारपणा पाहिला.. पण थोडी खोलात जावुन चौकशी केल्यावर समजलं की अंबानीच्या घरापुढे स्फोटक सापडलेल्या व नंतरच्या गाडीमालकाच्या निधनाच्या विषयावर आपण ही आक्रमकता दाखवलीय..
आणि या बाबत बोलताना आपण महाराष्ट्र पोलिसांवर देखील जोरात चिखलफेक केली..
वा देवेंद्रजी वा.. किती ही मालकांप्रती निष्ठा.. पण देवेंद्रजी मला एक समजत नाही हिच तत्परता आपण मंत्रालयाच्या तुमच्या दालनासमोर विष प्राशन करून जिवन संपवलेल्या धर्मा पाटलांना न्याय देण्याच्या बाबतीत का हो दाखवली नाही.. उलट मुख्यमंत्री असतेवेळी तुमचा दौरा धुळे जिल्ह्य़ात होता तेव्हा याच धर्मा पाटलांच्या कुटुंबीयांना तुम्ही नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते की.. 

बिचारे शेतकरी रामेश्वर भुसारे मंत्रालयात न्याय मागण्यासाठी येतात तेव्हा त्यांना मंत्रालयात मारहाण होते तेव्हा कुठे जातो तुमचा कणखर बाणा.. अन्वय नाईकची केस पाच वर्षे जैसे थे ठेवलीत आणि बिचार्‍या नाईक कुटुंबीयांवर अश्रु ढाळण्याची वेळ आणलीत तेव्हा तुमचा स्वाभिमान जागृत का झाला नाही देवेंद्रजी.. 
हीच तत्परता तुम्ही कोपर्डीतील नराधमांना शिक्षा देण्याबाबतील का दाखवली नाहीत.. हीच तत्परता छत्रपतींबाबत बोललेल्या छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्यात का दाखवली नाही.. हीच तत्परता सरसकट कर्जमाफी करताना का हो नाही दिसली.. हीच तत्परता जलयुक्त शिवार योजनेची चौकशी लावण्यात का हो नाही दिसली..
अशीच आक्रमकता जेव्हा कन्नडगे महाराष्ट्रातील सिमावासियांना त्रास देत होते तेव्हा नाहीत दाखवलीत.. महाराष्ट्राच्या वाट्याचे एकेक महत्वाचे प्रकल्प महाराष्ट्रातील मोठमोठी सरकारी कार्यालये उद्योगकंपन्या गुजरातला पळवल्या जात होत्या तेव्हा नाही दिसला तुमचा हा आक्रस्ताळेपणा..
कित्येक प्रकरणे झाली पण तुम्ही शांत पण वेळ जेव्हा मालकाच्या बाबतीत आली तेव्हा तर तुम्ही पुरते अंगार झाले.. पण एका धनदांडग्या गुजराथी उद्योगपती उद्योगपतीसाठी तुम्ही महाराष्ट्राची शान असणार्या महाराष्ट्र पोलिसांचीच बदनामी केली.. वा देवेंद्रजी वा.. चांगले ऋण फेडले महाराष्ट्राच्या रक्षणकर्त्यांचे.. 

पण आजचा आक्रस्ताळेपणा पाहुन चांगलं वाटलं.. विरोधीपक्षनेता आक्रमकचं हवा त्या शिवाय सरकार तरी कसं कटाक्षाने चालेल.. तुम्ही विरोधीपक्षनेते म्हणुन दिवसेंदिवस महाराष्ट्राचे फेवरेट बनत चालला आहात.. हे जर असंच चालु राहिलं तर आणखी वीस पंचवीस वर्षे तरी तुमची विरोधीपक्षनेतेपदाची जागा कोणीच हिसकावून घेवु शकत नाही ( अर्थात तुम्ही नाथाभाऊंची हिसकावून घेतली तो भाग वेगळा)
असो असेच आरडाओरड करत रहा.. पण कधीतरी या सगळ्या उद्योगपती व पक्षश्रेष्ठींची मर्जी संभाळत संभाळत चुकुन माकुन एखादा दिवस शेतकरीप्रश्नांवर तरी चार शब्द सभागृहात काढुन सत्तेत असताना केलेल्या चुकातुन उतराई होण्याचा नक्की प्रयत्न करा.. कारण ती संधी तुम्हाला चालुन आलीय....
जय जवान.! जय किसान..!!

- भोसले वसंत (facebook)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या