अन्याय झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करा अन्यथा जेलभरो

 अरुणा प्रकल्पग्रस्तांनी घेतली वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची भेट

वैभववाडी पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांची अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या वतीने लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, मुंबई अध्यक्ष  प्रकाश सावंत ,सेक्रेटरी अजय नागप, उपाध्यक्ष संतोष चव्हाण  पांडुरंग जाधव, मुकेश कदम,  राजा कांबळे,  महिला आघाडीच्या अध्यक्ष सुचिता चव्हाण,  सचिव आरती कांबळे, तसेच  सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र जाधव,  डि.के सुतार, अशोक राणे  यांच्या शिष्टमंडळाने  2 जाने 2021 रोजी भेट घेवून  अरुण प्रकल्पग्रस्तांवर झालेल्या अन्यायाची चर्चा केली.

मोबदला नाही, भुखंड नाही. पुनर्वसनाचा पत्ता नाही. कालवे तयार नसताना अरुणा प्रकल्पाची बेकायदेशीर घरभरणी करून प्रकल्पात पाणीसाठा केल्याने अरुणा प्रकल्पग्रस्तांची सुमारे 130 घरे प्रकल्पाच्या पाण्यात बुडालेली आहेत. सध्या पाण्याचा विसर्ग सुरू केलेला होता आणखी दोन दिवस पाणी सुरू राहिले असते तर गावातील अनेक घरे पाण्याची पातळी कमी झाल्याने  दिसायला लागली असती परंतु ज्या अधिकाऱ्यांनी हे पाप केलेले आहे ते आपल्या अंगलट येईल म्हणून 2 जाने 2021 रोजी पाण्याचा विसर्ग तातडीने बंद करण्यात आला आहे. ही सर्व माहिती वैभववाडी तालुक्याचे नूतन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना देण्यात आली.

अरुणा प्रकल्पग्रस्तांवर मोबदला वाटपात अन्याय झालेला आहे.पुनर्वसन गावठाणातील विकास कामे प्रलंबित आहेत. धरणाच्या पाण्यात बुडालेल्या घरांचा निर्णय होत नाही.त्यामुळे प्रकल्पग्रस्त अस्वस्थ आहेत.दुर्दैवाने एका प्रकल्पग्रस्तांने अलीकडेच आत्महत्या केलेली आहे. आदी बाबत तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप यांनी वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याशी चर्चा केली. 

अशा परिस्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून पाण्याचा विसर्ग बंद केल्याने अरुणा प्रकल्पग्रस्तांनी धरणाच्या पिचिंग चे काम बंद केलेले आहे. पोलिसानी मानवतेच्या दृष्टिकोनातून अन्याय झालेल्या अरुणा प्रकल्पग्रस्तांचे कडे पहावे परंतु बळाचा वापर करून अरुणा प्रकल्पग्रस्तांना पुन्हा एकदा हुसकावण्याचा प्रयत्न झाल्यास अरुणा प्रकल्पग्रस्त एक तर जेल भरो आंदोलन अथवा पोलीस ठाण्यासमोर अमरण उपोषण करतील असा इशारा प्रकल्प ग्रस्तांनी या वेळी दिला आहे.   

आमची आंदोलने लोकशाही तसेच कायदेशीर मागाँने होतील. कुठेही शांतता भंग होणार नाही असे तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप, यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक अतुल जाधव आणि पोलीस उप निरीक्षक देसाई यांनी कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी प्रकल्पग्रस्तांनी घ्यावी अशा  सूचना त्यांनी प्रकल्प ग्रस्ताचा यावेळी दिल्या.  प्रकल्पग्रस्तांशी सहाणुभुतीपुर्वक चर्चा केल्याने पोलिस निरीक्षक अतुल जाधव, उप पोलिस निरीक्षक देसाई यांच्या विषयी समाधान व्यक्त केले.


 पुनर्वसन कायद्या प्रमाणे प्रकल्प ग्रस्तांना देय असलेल्या सोई सुविधा न देता या प्रकल्पाची बेकायदेशीर घळभरणी करुन अरुणा प्रकल्पग्रस्तांची 130 घरे धरणाच्या पाण्यात बुडालेली आहेत.गरिबांची घरे बुडविण्याचा अधिकार कोणत्याही कायद्याने कुणालाही दिलेला नाही. अरुणा प्रकल्पात घरे बुडालेल्या प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून तानाजी कांबळे हे  योध्दासारखे काम करीत आहेत. सरकारी अधिकारी, ठेकेदार ,आणि धरणाची घळभरणी करु देणारे गावातील पुढारी यांच्यापासून कांबळे यांच्या जीवितास धोका आहे. पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष असतांना यापुवीँ त्यांच्यावर जीवघेणा प्राणघातक हल्ला झालेला आहे. त्यांच्या जीवाला आजही धोका कायम आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेवून सिंधुदुर्ग पोलीसांनी सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना पोलीस संरक्षण द्यावे. अरुणा प्रकल्पग्रस्तांची एकजूट अनेकांना नको आहे. परंतु प्रकल्पग्रस्तांनी गेली दोन वर्षे ठेकेदार, प्रशासनातील अधिकारी आणि गावातील पुढा-यांनी प्रकल्पात संगनमताने केलेल्या भ्रष्टाचाच्या विरोधात तानाजी कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रणशिंग फुंकले आहे. हे सर्व जन  आज ना उद्या अडचणीत येणार आहेत.त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांचा लढा संवणिण्यासाठी त्यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार तानाजी कांबळे यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या