'आदिम आदिवासीं सांस्कृतिक कला महोत्सव

 ई-संवाद आणि इन्फिनिटी फाऊंडेशन यांच्या वतीने प्राचिन तसेच कालांतराने लुप्त होत असलेल्या लोक कलांना पुनरुज्जीवित करण्यासाठीं तसेच पारंपरिक लोक कलाकारांना जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 'आदिम आदिवासीं सांस्कृतिक कला महोत्सव'आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातील आदिवासीं लोक कलाकारांना आपली प्राचीन कला जसे लोक नृत्य, लोक संगीत, लोक कथा कथन, लोक कविता, लोक नाट्य आदी कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील कलाकारांनी येत्या १० फेब्रुवारी पर्यंत आपल्या कलेचे  प्रात्यक्षिक तयार करून ३ ते ५ मिनिटांची चित्रफित (व्हिडिओ क्लिप) mediateamvb@gmail.com किंवा +91-9152002626 या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हॉट्सॲप करावी. सदर माहिती आपण आपल्या वृत्तपत्र तसेच मासिकांमधुन प्रसिद्ध केल्यास या कालाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यास मदत होऊ शकेल. आपले सहकार्य आमच्यासाठी अमुल्य आहे. 


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या